KiritSomaiya नागव्या राजकारणाच्या निमित्ताने... तुषार गायकवाड
किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओमुळे राजकीय वादळ उडाले असताना दिल्लीतील नेतृत्वाच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात अती उड्या मारणाऱ्या पक्षातील सर्वांसाठी हा धडा असावा वाचा लेखक तुषार गायकवाड यांनी केलेलं सखोल विश्लेषण….;
(टिप लेखातील लेखकांची मते त्यांची स्वतःची असून मॅक्स महाराष्ट्र त्याच्याशी संमत असेलच असे नाही)
भाजपा माजी खासदार आणि भाजपाचे राष्ट्रीय आरोप मंत्री किरीट सोमय्या कोणी तपस्वी किंवा महात्मा नव्हेत! गेले एक तप सातत्याने विरोधी विचारांच्या लोकांना भ्रष्टाचारी ठरवून चारित्र्यहनन करणारा राजकीय पक्षाचा दलाल आहे. शिवसेना उबाठा गटाचे राज्यसभा सदस्य या दलालाचा उल्लेख 'मुलुंडचा भडवा' असा करतात, तो योग्यच आहे.
भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचा विचार करता, कोणत्याही व्यक्तीला भ्रष्ट गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. गुन्हा सिध्द होत नाही, तोवर संबंधित व्यक्ती केवळ आरोपी असते. पण हा राजकीय दलाल इलेक्ट्रॉनिक मेडीयाला हाताशी धरुन अनेकांना गुन्हेगार ठरवून रिकामा होतो. असे या दलालाने गुन्हेगार ठरवलेले नेते जेव्हा भाजपमध्ये किंवा भाजपसोबत जातात तेव्हा याच दलालाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहीमेची वाचा जाते.
या दलालाने अनेकांची राजकीय आयुष्ये केवळ सत्तेचा वरदहस्त आणि मेडीया ट्रायलच्या माध्यमातून संपवलेली आहेत. नुकतेच भाजपसोबत जावून पावन होवून मंत्री झालेल्या हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने ईडीला 'आम्हाला गोळ्या घालून ठार करा' असे सांगितले होते. त्या माऊलीला हे वक्तव्य करताना किती त्रास झाला असेल? याचा विचार कधी कोणी केलाय का?
जर मुश्रीफ भ्रष्टाचारी होते? तर ते जेलमध्ये हवे होते. त्याऐवजी ते भाजपसोबत आहेत. याचा अर्थ काय? पहिला अर्थ भाजप भ्रष्टाचारी असल्याने असेच भ्रष्टाचार करणारे मंत्री म्हणून हवेत. आणि दुसरा अर्थ मुश्रीफ दोषी नव्हते. पण त्यांना ईडी मार्फत त्रास देवून भाजपसोबत जायला बाध्य केले.
कालपासून अनेक बेगडी पुरोगाम्यांना मानवतेचे आणि वैयक्तिक आयुष्याचे नैतिक सिंध्दात आठवत आहेत. काय रे बेगडी पुरोगाम्यानो? ईडीच्या चौकशीच्या नावाखाली लहान लेकरं, गर्भवती महिला, स्तनदा माता, रजस्वला स्त्रियांना डांबून त्रास दिला जातो. तेव्हा तुमच्या मानवतेला पान्हा फुटत नाही का? तेव्हा तुमची कोरडी माया कशी काय आटते? राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा उकीरडा करणाऱ्यांना नियती इतक्या सहजी सोडेल म्हणता?
वैयक्तिक आयुष्याचे म्हणत असाल? तर व्हायरल व्हिडिओत कोठेही समोरची व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने खोडसाळपणे किंवा हनी ट्रॅप लावून व्हिडिओ व्हायरल केलाय असं अजिबात दिसत नाही. नपुंसकता आल्याने एक रुग्ण आपल्या डाॅक्टरला व्हिडिओ पाठवतोय असे सुरुवातीला वाटते. नंतर मात्र पौगंडावस्थेतील लेकरासारखं गादीउशीसोबत खेळ व चेहऱ्यावरील भाव पाहून सदर व्हिडिओ त्याने स्वतःच रेकाॅर्ड केलाय हे स्पष्ट होते.
मूळ मुद्दा असा आहे की, हा व्हिडीओ व्हायरल झाला कसा? तर मोबाईल मधील अनेक अॅप्सना गॅलरी चा अॅक्सेस दिलेला असतो. अशा लोकांचे स्वतःच्या पक्षाचे अॅप्सही मोबाईल मध्ये कार्यरत असतात. त्या माध्यमातून गॅलरीतील व्हिडिओ व्हायरल झाला असण्याची शक्यता जास्त आहे.
अवघ्या ६ महिन्यांवर लोकसभा निवडणूका आलेत. त्यानंतर विधानसभा निवडणूका आहेत. शिवाय राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती लवकरच होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारातून बाजूला करण्यासाठी आयते कारण मिळालेय. हा गेम पूर्वनियोजित होता. कदाचित् तिसऱ्या भिडूने सत्तेत सहभागी होताना किरीट नामक कारेटं फोडायची अट ठेवली असेल!
त्याचसोबत दिल्लीच्या नेतृत्वाच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात अति उड्या मारणाऱ्या पक्षातील सर्वांसाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा धडधडीत धडा दिला असावा. ती शक्यता कशी काय नाकारता येईल? खडसे, तावडे, मुंडे विसरलात काय??
फक्त एकाच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे, नेत्यांचे वैयक्तिक पातळीवरील सेक्स फँटसीचे व्हिडिओ ऐनवेळी बाहेर येतात. त्या पक्षाची राजकीय संस्कृती अशीच आहे! फक्त किरीटच्या रुपाने त्यांचे नागवे राजकारण परत एकदा चव्हाट्यावर आले आहे!!
नियती कोणालासुध्दा सोडत नाही! कोणालासुध्दा!!
- तुषार गायकवाड