लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या विचाराने जसा समाज जागृत होत आहे. तसे त्यांच्या बद्दल वेगवेगळ्या अतिरंजित आणि सपशेल खोटारड्या गोष्टी भाषणातून आणि पुस्तकातून पेरल्या जात आहेत, अशा खोट्या गोष्टी छापलेल्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार देखील दिला आहे. आण्णा भाऊ साठे त्यांच्या दोघी मुली त्यांचा भाऊ शंकर साठे यांचा सहवास लाभला. असे अनेक समज- गैरसमज नेमके कोणते? यासंदर्भात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी संवाद साधला.