खाणार ओबीसींचं गाणार मराठ्यांचं – प्रा. श्रावण देवरे

आरक्षणासाठी मराठा समाजाची नवीन मोहीम? मराठा v/s ओबीसी असा वाद रंगण्याची शक्यता... मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकते का? पाहा प्रा. श्रावण देवरे यांचे विश्लेषण खाणार ओबीसींचं गाणार मराठ्यांचं;

Update: 2021-02-15 14:16 GMT

मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी नवीन मोहीमेची घोषणा केली आहे. येत्या शिवजयंतीपासून ही मोहीम राज्यभरात राबविणार आहे.

काय आहे मराठा आरक्षणासाठीची मोहीम?

राज्यातल्या नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीद्वारे मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावे. यासाठी प्रत्येक गावातल्या ग्रामसभेत ठराव करुन घेतले जाणार आहे. हे सगळे ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठरावातून मागण्या पू्र्ण झाल्या नाही. तर ग्रामपंचायतीच्या पातळीवर मोठ्याप्रमाणात आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे.

यावर ओबीसी समाजाचे प्रा. श्रावण देवरे यांनी आपली भूमिका मांडली…

Full View

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या ओबीसी सदस्यांनी करावा. आणि तो मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करावा असे आवाहन देवरे यांनी केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने EWS कॅटगरीमार्फत मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही. 'महाराष्ट्र शासनाने EWS च्या मार्फत मिळणारे १० टक्के आरक्षण २० किंवा ३० टक्के करुन मराठा समाजाला स्वतंत्र पद्धतीने आरक्षण द्यावे' असा ठराव मांडण्यात यावा असा पर्याय प्रा. श्रावण देवरे यांनी सांगितलेला आहे.

-प्रा. श्रावण देवरे

Tags:    

Similar News