बाई ग ! यात तुझी चुक नाय

आपला जीव वाचवत पळणार ती. तीची चुक ती काय? मानवतेचीच धिंड काढणारी घटना मणिपूरला घडली तरी बलात्काराचे समर्थन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर पसरवल्या गेल्या यात बाईपण शोधण्याचा प्रयत्न केलाय प्रियदर्शिनी हिंगे यांनी..;

Update: 2023-07-22 11:12 GMT

गेल्या महिनाभर बाई पण भारी देवा हा मराठी सिनेमा सिनेमागृहात धुमाकुळ घालतोय. काही कोटींची कमाई या फिल्मने केलीये. मराठी सिनेमा हा लोकांना आवडतोय हि मोठी यशाची बाजू आहे. पोस्टरच्या बाजुला काळ्या रंगांचा गॅागल चढवलेल्या महिला मोठ्या ऐटीत फोटो काढताना बघणं हे भारी होतं. या बरोबर अनेक महिला याच चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स करतांना दिसतात. एक प्रकारचा उत्साहच महिलांमध्ये संचारलेला दिसत होता. अनेक वर्षा नंतर या निमित्ताने महिला एकत्रीत येताना दिसल्या. चार बहिणीच्या या कहाणीत प्रत्येक महिला स्वतःला को रिलेट करु बघत होती. आपण कसं सगळ्यासाठी करतो नी सगळे आपल्याला वर अन्याय करतात याच प्रकारची ती कथा. यालाच “बाईपण” म्हटलं असावं. मात्र ही जर बाईपणाची व्याख्या असंख्य स्त्रीयांना आवडत असेल तर ? अशा प्रश्न उपस्थित होतो.

मणिपुर मधली घटना जेव्हा समोर येते तेव्हाही त्याला दोन महिने उलटून गेलेले असतात. मग कुठे यंत्रणा हालल्या सारखे दाखवतात. मेंदुही गोठावा अशी ती घटना. या महिल्यांच्या बाईपणाच काय? असा प्रश्न मात्र आपल्यातील कोणालाही पडत नाही. याची खंतही वाटतं नाही.

मणिपूरमध्ये दोन कुकी समुदायाच्या महिलांना जमावाने नग्न करून त्यांची धिंड काढली.या पीडित महिलांना काही पुरुष शेतात ओढत घेऊन जाताना व्हिडीओत दिसतंय,यावेळी इतरही अनेक तरुण या महिलांबरोबर चालताना दिसत आहेत. ‘स्क्रोल डॉट इन’ने या घटनेतून बचावलेल्या एका पीडितेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर ४ मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील बी फाइनोम या गावाजवळ ही घटना घडली आहे. मेईतेई समाजाचे लोक जवळच्या गावात घरे जाळत आहेत, हे ऐकल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पीडित महिलेचं कुटुंब आणि इतर काही लोकांनी आडमार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने त्यांना शोधून काढले. संबंधित महिलेच्या मुलाला आणि शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला काही अंतरावर नेऊन जमावाने ठार मारलं.त्यानंतर जमावाने महिलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. जमावाने आमचे कपडे काढण्यास सांगितले, असच ती माऊली सांगते.

“आम्ही विरोध केला असता जमावाने आम्हाला सांगितलं की, तुम्ही अंगावरचे कपडे काढा, नाहीतर तुम्हाला ठार मारू. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मी अंगावरील प्रत्येक कपडा काढला” असं ४० वर्षीय पीडित महिलेनं काही वृत्तपत्रांना सांगते. तसेच घराशेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीबरोबर काय होत आहे? याची तिला जाणीव नव्हती

महिलेनं पुढे सांगितलं की, जमावाने आमची नग्न धिंड काढल्यानंतर, दोघींना रस्त्याच्या कडेला असलेल्या भाताच्या शेतात नेलं. तिथे काही पुरुषांनी मला जमिनीवर झोपायला सांगितलं. घाबरलेल्या अवस्थेत मी त्यांनी (जमावाने) सांगितल्याप्रमाणे जमिनीवर झोपले. यावेळी तीन जणांनी मला घेरलं. यातील एकाने दुसऱ्याला सांगितलं की, चला हिच्यावर बलात्कार करू, पण शेवटी त्यांनी तसं केलं नाही. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी यातून बचावले. पण जमावातील अनेकांनी माझे स्तन पकडून अत्याचार केला, असंही पीडितेनं सांगितलं.

यानंतर पीडित महिलेच्या कुटुबियांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलीस ठाण्यात दिली. १८ मे रोजी सैकुल पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर (गुन्ह्याचं घटनास्थळ विचारात न घेता कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची तरतूद) नोंदवण्यात आला. खून आणि बलात्कारासह इतर कलमांतर्गत ८०० ते १००० अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ मे रोजी दुपारी ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

यालाच बाईपण म्हणावं का? कुणाचा तरी राग उतरवण्याचा मार्ग त्या बाईच्या शरिरान व्हावं. दोन महिन्या नंतर पुन्हा त्या व्हिडीओ ने तोच प्रसंग सर्व जगा समोर आणावा? बाई तुझी चुक नाही यांत. बलात्कार हा तुझ्यावर झाला तरी चारित्र्य त्या नराधमांच गेलंय. तु माध्यम बनली त्या नराधमांच्या कुत्सिक मानसिकतेच्या प्रदर्शनाच. यात बाईपणाच ओझ झुगाराव म्हणुन ती सावित्री तुझ्या शिक्षणासाठी लढली मात्र या बाईपणाला नविन आकार द्यावा कि दुर झुगारुन द्याव? कि गोंजारत बसाव त्या बाईपणाचे गोडवे हे बाईचच बाईला कळतंय नाहीये. पण यांच तुझी चुकं ती काय?

प्रियदर्शिनी हिंगे

Tags:    

Similar News