इस्रायलमध्ये पहिल्यांदा आघाडी उदारमतवादी सरकार
जगभरात उजव्या विचारसरणीचे प्राबल्य असताना इस्राईलमध्ये अचानकपणे सत्ताबदल झाला या सत्ता बदलाचं विश्लेषण केले आहे अभ्यासक विकास मेश्राम यांनी...
बुधवार हा दिवस गुरुवार बदलण्यासाठी फक्त 35 मिनिटे शिल्लक होती. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू बुधवारी मध्यरात्री 12 वाजता बहुमत सिद्ध करणार होते परंतु वेळेचे चक्र व चित्र फिरले त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आणि उलटा पालट होवून अखेरीस यासर लॅपीड यांनी अध्यक्ष रिवन रिव्हलिन यांना माहिती दिली की त्यांच्याकडे सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असून आमच्याकडे आठ-पक्षीय आघाडीचे बहुमत आहे. नव्या सरकारमध्ये यमीना पक्षाच्या प्रमुख नफ्ताली बेनेट सप्टेंबर 2023 पर्यंत पंतप्रधानपदावर राहतील आणि त्यानंतर यासर लॅपीड नोव्हेंबर 2025 पर्यंत पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील. यायर लॅपीड यांनी 2012 मध्ये यश आतिद या पक्षाची स्थापना केली हा पक्ष धर्मनिरपेक्ष मध्यमवर्गाचा पक्ष म्हणून याला मान्यता मिळाली आहे.
या आठ पक्षाच्या सहमती करारापूर्वी, सर्वजण इस्त्राईलमधील अरब लोकांच्या पाठिंब्याने जिंकलेल्या 'रा'म' पक्षाचे नेते मन्सूर अब्बास यांची भूमिका काय आहे या कडे सर्वाचे लक्ष होते. इस्रायलच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या अरब पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होत आहे. रा'म चे नेते मन्सूर अब्बास यांनी मंत्रिमंडळातील 53 बिलीयन चे पॅकेज आणि महत्त्वपूर्ण विभागांनंतर अरब संस्थांना पाठिंबा देण्यास सहमती दर्शविली. 120 सदस्यीय इस्त्रायली संसद 'क्नेसेट' मध्ये स्थापन होणार असलेल्या युती सरकारचे एकूण 61 सदस्य आहेत. जर 2025 पर्यंत केवळ एकाच सदस्याच्या बहुमताचे सरकार सक्षम होते का हे पाहणे औतुक्याचे असेल त्यालाही इतिहास नवीन निर्मिती म्हटले जाईल.
संसदेची पहिली बैठक बहुधा 7 जून रोजी होईल, 12 दिवसांत नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. बेंजामिन नेतान्याहू भव्य सरकार खाली खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. संसदेचे अध्यक्ष 'क्नेसेट यारीव लेविन हे नेतान्याहूच्या लिकुड पक्षाचे सदस्य राहिले आहेत. या आघाडीत सामील झालेल्या यमीना पक्षाचे एकूण सात खासदार निवडणुका जिंकले , त्यातील एक खासदार सरकारमध्ये जाण्यास अनुकूल नाही. यमीनाचे खासदार आमचाई चिकली यांनी मी युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे.
23 मार्च 2021 रोजी निवडणूक निकाल जिंकलेल्या 13 पक्षांपैकी आठ पक्षांच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. यश आतिद पक्षाचे 17 खासदार आहेत . युतीसाठी सर्वात सक्रिय असलेला यश अतीदचा नेता यायर लॅपीड पहिल्या फेरीत पंतप्रधान होत नाही. , तर ब्लू एन्ड व्हाइटचे 8 , यिसराएल बेतेनूचे 7,लेबर पक्षाचे 7 ,यमीनाचे 6 ,न्यू होपचे 6, मेरेज 6 आणि रा "म 4 खासदार या महाआघाडीत आहेत. युतीमध्ये सामील झालेल्या पक्षांनीही खाते वाटप पण केले आहे. उदाहरणार्थ, जैर लॅपीड पहिल्या दोन वर्षांच्या परराष्ट्रमंत्री असतील, ब्ल्यू आणि व्हाइटचे नेते बेन्नी गांज संरक्षणमंत्री होतील, तर इस्त्रायल बेटेनूचे नेते एग्वीडोर लीबरमॅन अर्थमंत्री होतील, न्यू होपचे नेते गिडोन सार न्यायमंत्री, यमीना पक्ष नेता आयलेट शाकेद गृहमंत्री होतील, कामगार नेते मिशली यांनी परिवहन मंत्री होण्याचे मान्य केले आहे, त्याचा सहकारी ओमर बार्लेव सार्वजनिक सुरक्षा मंत्री होतील. या व्यतिरिक्त आणखी बरेच खासदार मंत्र्यांच्या यादीत आहेत.
इस्रायलच्या संसदीय इतिहासात बर्याच विचित्र गोष्टी घडल्या आहेत. एप्रिल 2019 पासून मार्च 2021 पर्यंत चार वेळा संसद निवडणुका घेण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2018 मध्ये क्लेसेटचे विघटन झाल्यापासून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही . मार्च 2021 च्या निवडणुकीच्या निकालानंतर नेतान्याहू यांनी यामीना पक्षाचे नेते आयलेट शॉकेद आणि न्यू होप पक्षाचे नेते गिदोन सार यांच्यावर याइर लॅपीडबरोबर युतीमध्ये न सामील होण्यासाठी दबाव आणला.
71 वर्षीय नेतान्याहू यांनी मार्च, 2009 रोजी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधानांची खुर्ची पाच वेळा सांभाळणे देखील नेतन्याहू यांच्यासाठी मोठे आव्हान होते. प्रभावी राष्ट्रवादामुळे नेतान्याहू यांनी 12 वर्षांपासून देशातील लोकांचे लक्ष ज्वलंत राष्ट्रवाद या एकतर्फी मुद्दा वर गुंतवून ठेवले होते. यावेळी देखील 'बीबी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांनी संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादाचा प्रकाश कायम ठेवला होता. त्यांच्या आक्रमक भूमिकेला गाझा पट्टीतील हमासच्या कारवायांनी बळकटी दिली. 11 दिवसाच्या युद्धामधील लोकांचे एकतर्फी लक्ष तिथे होते, दुसरीकडे नेतान्याहू सत्तेच्या समीकरणात सक्रिय होते. जर्मन पाणबुडी कराराच्या भष्टाचारात नेतान्याहू गुंतले आहेत. बेन्जामिन नेतान्याहू यांचे "थायसन क्रूप" येथेही समभाग शेयर्स आहेत ज्यांच्यामार्फत इजिप्तला जर्मन पाणबुडी पुरविली होती . पाणबुडी भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर 42 टक्के लोकांनी '' बेन्जामिन नेतान्याहू अप्रामाणिक मानले. पण 27 टक्के लोक म्हणतात, 'पंतप्रधानांनी जे काही केले ते त्यांनी देशासाठी केले.' हे देखील आश्चर्यकारक आहे की सर्व प्रकारच्या घोटाळे देशहिताच्या नावाखाली लपविता येऊ शकतात.
नेतान्याहूच्या लिकुड पक्षाचे राष्ट्रवाद पाहण्यासारखे आहे. नेतान्याहूची पत्नी सारा यांच्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे फर्निचर खरेदी करण्यासाठी आणि सजवण्यासाठी पैसे खर्च केल्याचा आरोप आहे. साराकडे डिसेंबर 2016 ते 24 एप्रिल 2017 पर्यंत अनेकदा चौकशी केली गेली. ऑस्ट्रेलियन अब्जाधीश जेम्स पैकरकडून महागड्या भेट मिळाल्याबद्दल स्वत: नेतान्याहू वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वृत्तपत्रातून जाहिरात करणार्या इतर माध्यमांतून ज्यू मीडियाच्या मोगल अर्नॉन मूसाचा प्रचार करण्याच्या प्रयत्न करण्याच्या गंभीर आरोपांना नेतान्याहू यांना तोंड द्यावे लागले. आघाडी सरकार या तिन्ही प्रकरणांचा तपास वेगवान करेल, अशी शक्यता आहे. यामागचे कारण समजण्यासारखे आहे की नेतान्याहू जर कमकुवत असतील तर त्यांच्या छावणीतील सदस्य तुटून युतीमध्ये सामील होऊ शकतात.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपण निवडणूक जिंकल्याची कबुली दिली होती आणि जर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर मी पुन्हा भारताला भेट देईन असे म्हटले होते पण दुर्दैवाने, ही इच्छा पूर्ण झाली नाही. 14 जानेवारी 2018 रोजी नेतान्याहू सहा दिवसांच्या भेटीवर दिल्लीला आले होते . 2003 नंतर इस्रायलच्या पंतप्रधानांची ही पहिली भेट होती. पंतप्रधान मोदींसह नेतान्याहू यांचे नाते सर्वश्रुत आहे. गेल्या सात वर्षांत उजव्या विचारसरणीच्या पातळीवर दोन्ही देशांमधील बरेच लोक 'पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट' झाले आहेत, द्विपक्षीय सामरिक भागीदारी वाढली आहे. आता प्रश्न असा आहे की, इस्त्राईलमधील नवीन विचारधारा सरकारचे कोणते समीकरण बसतील? त्या आघाडी सरकारमध्ये केंद्रावादीही आहेत आणि अरब हितसंबंधांचा विचार करणारा 'राम' पक्ष आहे.
विकास परसराम मेश्राम गोदिंया
vikasmeshram04@gmail.com