डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे पक्ष मोठ्या पक्षाच्या दावणीला का बांधले जातात? राम पुनियांनी यांचा सवाल…
भारतात आंबेडकरी विचाराच्या नावाने विविध पक्ष काम करतात. मात्र, आंबेडकरी विचाराच्या विरुद्ध कार्य असणाऱ्या पक्षाला हे पक्ष मदत करतात. त्यामुळं आंबेडकरांच्या नावाने सुरु असलेले हे पक्ष खरंच आंबेडकरांच्या विचाराशी बांधील आहेत का? असा सवाल ज्येष्ठ इतिहासकार, लेखक राम पुनियानी यांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती. त्यानिमित्ताने आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे समजून घ्यावे? यावर लेखक राम पुनियानी भाष्य केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची लेखनी शैली कशी अवगत झाली? 1980 साली त्यांनी वाचलेलं डॉ. बाबासाहेबांचं The Riddle of Rama and Krishna हे पुस्तक काय शिकवतं ? तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची किती गरज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या फोटो, मूर्तीला हार घालण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात कसे आणता येईल यावर आजच्या पिढीने लक्ष दिलं पाहिजे. असं लेखक राम पुनियानी सांगतात.. पाहा हा व्हिडिओ…