डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर --एक दिव्य प्रेरणा स्त्रोत"

एकविसाव्या शतकात देखील जातीचे अस्तित्व जाणवते. "जी जात नाही ती जात." हे बिरुद आपण अभिमानाने मिरवतो. आजही जातीचे अस्तित्व दिसून येते. परंतु प्रतिकूल काळात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मूलनाचे भरीव काम केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती निर्मूलनासहित विविधांगी कामावर प्रकाश टाकला आहे. शिक्षिका तसेच मुक्त पत्रकार असणाऱ्या अश्विनी केशवराव गावंडे यांनी...;

Update: 2022-04-14 02:38 GMT

या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांमध्ये समाजाच्या विविध स्तरावर वेगवेगळे वर्ग होते आणि आजही आहेत. म्हणजे , जसा गरीब आणि श्रीमंत, जास्त सुविधा असणारे कमी सुविधा असणारे इत्यादी इत्यादी आणि परंतु यामध्ये तरलता(fluidity) होती . म्हणजे साध्या-सोप्या प्रयत्नांनी गरीब व्यक्ती श्रीमंत होऊ शकत होता तो सुविधा प्राप्त करून घेऊ शकत होता. ही सतत बदलत जाणारी परिस्थिती होती. आणि त्यामध्ये कोणाला ही आक्षेप नव्हता.

परंतू भारतामध्ये मात्र वर्ग व्यवस्थे सोबतच वर्ण व्यवस्थेची निर्मिती झाली हे मात्र वॉटरटार्ईट कंपार्टमेंट होते. वर्ग व्यवस्थेत तरलता होती. मात्र वर्णव्यवस्थेत तरलता नव्हती किंबहुना शुन्य तरलता होती. ब्राह्मण ,क्षत्रिय, वैश्य शूद्र या वर्णा सोबतच अनेक जाती आणि पोटजाती या वर्णव्यवस्थेत निर्माण करण्यात आल्या.

यामध्ये एक व्यक्ती म्हणून तुम्ही कितीही उच्च पराक्रम करा कर्तुत्व गाजवा तुम्ही राहणार तेच आहात. ज्या वर्णाचे किंवा जातीचे तुम्ही आहात. ज्या जाती किंवा वर्णात तुम्ही जन्म घेतला आहात. वर्ण व्यवस्थेमुळे समाजाची तरलता नष्ट झाली सोबतच एका वर्णातल्या व्यक्तीची दुसऱ्या इतर वर्णातल्या व्यक्तीशी एकमेकांसोबत असलेली स्पर्धा रीतसर नष्ट करण्यात आली आणि आपापली वाट निर्धोक करण्यात आली. त्याच्या जोडीला कर्मसिद्धांत अशा पद्धतीने रुजवण्यात आला कि जर प्रत्येक व्यक्ती मलाच हा त्रास का? मी असे जीवन का जगतो आहे? असा विचार करेल तेव्हा त्याला उत्तर मिळेल की तुझे कर्म त्याला कारणीभूत आहेत हे उत्तर मिळेल ,मी कर्मसिद्धांत मानत नाही किंवा तो नाकारते असे नाही ,तर तो समाजात कोणत्या पद्धतीने पोहोचलाय यावर आपलं लक्ष केंद्रित करते आहे. त्यावर आणखी शिकवणही दिल्या जाते की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे संभ्रमात आणखी संभ्रम.

परंतु जगताना मला वरील नियमाचे प्रत्यंतर येत नाही. भारत स्वातंत्र्य होउन आज 74 वर्ष उलटून गेल्यानंतरही. वरवर सामाजिक अभिसरण दिसत आहे .परंतु आज ही या आधुनिक युगात तुमची जात आणि तुमचं आडनाव च ठरवते आहे ,की तुमचा प्रवास कुठपर्यंत राहणार आहे .कुठपर्यंत होणार आहे. मग आपण एका सार्वभौम देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून म्हणून मिळवलं काय? तर सामाजिक जडत्व. कारण जगण्याच्या सर्वांच्या वाटच आपण वेगळ्या करून टाकल्या, जगण्याच्या सर्व स्तरावर हे आजही प्रत्ययास येते .त्यामुळे आपण आजही एकसंध होऊ शकत नाही. किंबहुना त्यामुळे संपूर्ण देश गुलामगिरीत गेला कारण राज्यकर्ता कोणीही असो, देश चालवणारा कोणीही असो ,माझ्या वैयक्तिक जगण्याचा स्तरावर कोणता फरक पडणार आहे? ही सामाजिक विचारसरणी तयार झाली.

एकविसाव्या शतकाचे बावीसावे वर्ष सुरू झाले. आपण संपूर्ण पृथ्वीला ग्लोबल व्हिलेज म्हणायला लागलो. तरी ही "जी जात नाही ती जात." हे बिरुद आपण अभिमानाने मिरवतो आहोतच. कारण " जात नाही ती जात " असे नसून मला ती सोडायचीच नाही. माझ्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ती पकडून ठेवण्यातच आजही मला स्वारस्य आहे. कारण त्यातूनच माझे छोटे छोटे स्वार्थ पूर्ण होतात.

असाच किंबहुना यापेक्षा दुप्पट तिप्पट ताकदीचा वर्ण व्यवस्थेमध्ये वॉटरटाईट कंपार्टमेंटमध्ये 18 91 साली डॉ. बी. आर .आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांच्या महापरिनिर्वाणाला ही आज 65-66 वर्षे झालीत. आजपर्यंत स्वतःच्या तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक कंपार्टमेंट शी भिडत, त्याची.एक-एक भिंत छेदत विजेच्या सामर्थ्याने प्रवास करत संपूर्ण जगासमोर एक मूर्तिमंत ज्ञानसूर्य "उभा ठाकला. तो आंबेडकरांच्या रूपाने." गेली पाच हजार वर्षात मानवी इतिहासात इतका बुद्धिमान मानव झाला नाही." असा मानव इतिहास सांगतो.

आणि आपण सामान्य जण त्यांनाही ठोकपीट करून ,आपल्या कुवतीप्रमाणे हा या जातीचा, नेता ,तो त्या जातीचा पुढारी म्हणून वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये अजूनही बसवत आहोत. त्यांनी जी बंधन स्वतःच्या सामर्थ्याने तोडलीत, इतरांनीही ती तोडावी यासाठी सामर्थ्य निर्माण केले. ही बाब म्हणजे त्यावर पाणी फेरणारी आहे.

त्यासाठी लागणारे खरे हत्यार कोणते? ते वापरावे कसे? याचे चौफेर ज्ञान दिले आणि आपल्या प्रत्यक्ष जगण्याने, कार्यकर्तृत्वाने उदाहरण घालून दिले. आजच्या भाषेत सांगायचे तर जन्मापासून मृत्यूपर्यंत24×7 हे एकच काम केले ,त्यांनाही आपण वर्ण व्यवस्थेत व्यवस्थित आप आपला नेता म्हणून बसवलेच की. (तशी अनेक नररत्नांची आपण वाटणी केली आहेच.)

माझ्या मते डॉ. आंबेडकर हे वैश्विक आहेत. ते साऱ्यांचेच आहेत. व्यक्तीची self respect ,self dignity,self esteem म्हणजे काय असते? ते एका उदाहरणाने दाखवून देतात की " ज्या शाळांनी त्यांना प्रवेश नाकारला अश्या प्रत्येक शाळेमध्ये आज त्यांची फक्त प्रतिमाच आहे असे नाही तर ती पूजनीय आणि प्रेरणादायी आहे."

त्यांच्यामते Education should be the weapon for emancipation." अर्थात शिक्षणाने लोकं स्वतंत्र / मुक्त झाली पाहिजेत. शिक्षण घेतल्याने सर्वजण विशेष धार्मिक आणि वैचारिक बंधनातून मुक्त झाली पाहिजेत. बंधनमुक्त म्हणजे स्वतंत्र. आणि स्वतंत्र विचारसरणी निर्माण करणे हे शिक्षणाचे काम आहे .त्यांनी त्यांच्या आयुष्यात तेच केलं. *सामाजिक व्यवस्थेविरुद्ध त्यांच्या पद्धतीने एकट्याने एल्गार पुकारला , तो स्वबळावर एकट्याने नेटाने पुढे नेला.

माझ्यामते -" बाबासाहेब हे सर्व ज्ञान ग्रहण करणाऱ्यांसाठी आयकॉन आहेत.". लोकं परदेशातून परत येताना तेथील वस्तू किंवा खास प्रतिकं घेऊन येतात. बाबासाहेब कायम पुस्तकं घेऊन येत असत.

माझ्यामते पुस्तके म्हणजे काय तर जो पुस्तक लिहितो ते त्याच्या जगण्याचे सारं असते . त्याचे अनुभव असतात. त्यातून त्याचे जगण्याचे सिद्धांत तयार झालेले असतात. प्रत्येक पुस्तकाला त्या त्या लेखकाचा तो ज्या काळात जगला त्याचे आभा मंडळ (aura)असते.त्यातून मी काय.घेउ शकतो किंवा काय शिकू शकतो हेच बाबासाहेबांनी सतत बघीतल असावं असे मला वाटते.

प्रत्येक व्यक्ती जीवन भर विद्यार्थी असतो असे आपण म्हणतो बाबासाहेब विद्यार्थी पण जगले.

हे जगणं सायास नव्हतं त्यांनी ते स्वप्रयत्नानी साधलं. त्यांनी शिक्षणामध्ये युटिलिटी अर्थात उपयुक्ततावाद याचा पुरस्कार केला जे कालसुसंगत आहे. मी करू शकत असेल तेथून ते घ्यावं आणि उपयोगात आणावं. त्यांनी ते उपयोगात आणलं आज ज्या गोष्टी आपण एकविसाव्या शतकाचा स्किल म्हणून वापरतो .त्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात निरंतर वापरल्या अशी माझी अल्पमती मला सांगते त्या म्हणजे learn,relearn,unlearn .

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं वचन सर्वश्रुत आहेच. (आज आपण पैसे कमविण्यासाठी मिळविलेल्या गुणांना ज्ञान म्हणतो तो भाग निराळा.)

सिद्धार्थ कॉलेज ची स्थापना आणि त्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्याचा अंश दिसून येतो त्यांच्या मते ज्ञान म्हणजे काय? तर "सत्याच्या शोधाच ज्ञान ,मानव धर्म समजण्याच ज्ञान, निसर्गदत्त हक्क प्राप्त करण्याचा ज्ञान." त्यासाठी एकत्र या संघटीत व्हा, --कोणी संघटीत व्हा? असे ज्ञान मिळवण्यासाठी ज्यांना नाकारल्या जात आहे त्यांनी . आणि संघर्ष करा कोणा विरुद्ध संघर्ष करा.

हे सर्व ज्ञान मिळवण्याचे रस्ते ज्यांनी रोखून धरले आहेत त्यांच्याविरुद्ध. आणि जर का ग्लोबल व्हिलेज "च्या या जगात ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत तर मग हा संघर्ष उरतो तो फक्त स्वतःच्या अज्ञानाची संघर्ष करण्याचा.

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सूत्र मला एकविसाव्या शतकात वापरायचं असेल तर मला हे स्पष्ट असलं पाहिजे अज्ञानापासून, संघटित होण्यापासून आणि संघर्ष करण्यापासून मला रोखणर्या या प्रवृत्ती आहेत. ज्या माझ्या स्वकियांमध्ये ही आहेत, परकीयां मध्येही आहेत, आणि माझ्या मधे ही आहेत. माझ्यासाठी ही आहेत आणि इतरांसाठीही आहेत अर्थात आजचा संघर्ष हा जितका दृश्य आहे तेवढाच तो अदृश्य ही आहे.

ज्ञान ग्रहण करून स्वतःच्या आयुष्यासाठी त्याचा उपयोग जेवढा महत्त्वाचा तितका त्याचा समाजासाठी सद् उपयोगही महत्त्वाचा. उपयोगी आणि सदुपयोगी व्हायचं असेल तर बाबासाहेबांनी नेहमी शीलवंत आणि प्रज्ञावंत असण्यावर भर दिला आजचा युवक जेवढा बौद्धिक सामर्थ्य बाळगणारा असावा तितकाच तो चारित्र्यवान असण्यावर भर दिला. आयुष्यात फक्त उपदेश देऊन बाबासाहेब कधिच थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्येक गोष्ट करून दाखविली म्हणूनच आज त्यांचं कोलंबिया विद्यापीठांच्या मार्कांचा रेकॉर्ड आजतागायत कोणालाही तोडता आलेला नाही.

मला नेहमी वाटतं बाबासाहेबांनी Mediocrity is crime. हेच स्वतःच्या जीवनाचं ब्रीदवाक्य ठरविले असावे म्हणून जे काही करेल ते फक्त उत्कृष्ट हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होतं.

त्यांनी नेहमी युवकांना केंद्रीभूत बदल घडवणारे मानव म्हणून सतत एक ज्ञान ज्योत पेटती ठेवली. He was / is and will remain the eternal source of inspiration. ज्ञानापासून वंचित राहिलेल्या भारतीयांनी ज्ञानग्रहण करावं महत्त्वाकांक्षी बनावं आणि इतरांमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करावी असे ते म्हणत असत.

अशा ज्ञानसंपन्न लोकांनी पुढे काय करावं तर, अन्यायग्रस्त शोषित वर्गाला संरक्षण द्यावे त्यांचे अश्रु पुसावे, त्यांना न्याय मिळवून द्यावा कारण त्यांच्या लेखी शिक्षणाचे महत्त्व केवळ परीक्षा देणे हे नसून समस्या निराकरण हे अंतिम ध्येय होतं.

बाबासाहेब दूरदर्शी होते तसेच स्पष्टवक्ते होते

ते म्हणायचे मुस्लिम नेत्यांना धर्मनिरपेक्षता समजत नाही कारण ते हिंदूंना आपले विरोधी मानतात त्यांनी हा विरोध सोडला तर आपण कमजोर पडू असे त्यांना सतत वाटत राहते. म्हणून पाकिस्तान निर्मितीला त्यांनी चांगला पर्याय मांनले होते.

चीन विषयी 1954 मध्ये केलेले वक्तव्य आजही तंतोतंत लागू पडते.ज्यांची निती आक्रमक असते ते ती कधीच सोडत नाही आजही एवढे वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्याला त्याचे प्रत्यंतर येतच आहे.

लोकशाही विषयी सुद्धा त्यांचे परखड मत होते ते म्हणत ज्या देशातील बहुसंख्य जनता सत्तेमध्ये आपल्या सहभागा पासून वंचित आहे तिथे काही लोकशाही नाही.

बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी कधी इंग्रजी शिक्षण पद्धतीला विरोध केला नाही. किंवा त्यावर टीका केली नाही कारण ती पद्धती त्यांना मान्य होती म्हणून नव्हे तर प्रचंड अज्ञानाच्या गर्तेत ज्ञानाची कवाडं किलकिली करून ज्ञानाची किरणं त्यातून येत होती म्हणून.

भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी जे काही सामावून घेतलं त्याला मास्टर स्ट्रोक म्हणावं लागेल. त्या एकाच स्ट्रोक मध्ये त्यांनी तळागाळातील भारतीय नागरिकाला वंचित समाजाला एका झटक्यात जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं

मूलभूत हक्कांच्या स्वरूपात

  • समानतेचा हक्क
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
  • शोषणापासून संरक्षणाचा हक्क
  • धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क संवैधानिमालमत्तेचा हक्क (हा हक्क ४४व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून वगळूनकायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला.
  • कामगारांना किमान वेतन, कामाच्या तासावर मर्यादा, बोनस, किफायतशीर घरे यांबाबतीत ते आग्रही होतेच.
  • कौशल्य विकास योजने'ची आवश्यकताबाबासाहेबांना *स्वातंत्रपूर्व काळातच वाटू लागली होती.
  • स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८ मध्ये संविधान सभेत "हिंदू कोड बिल" चा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल, त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. याकायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणिमुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात.
  • तेव्हा तर हे हिंदू कोड बिल पास होऊ शकले नाही परंतु त्यानंतर महिलांविषयी आलेल्या विविध कायद्यांमध्ये बाबासाहेबांचा हाच विचार वारंवार महिलांविषयक विविध कायद्यांच्या स्वरूपाने समोर येत राहिला.
  • त्यांची भारताच्या शेतकऱ्यांविषयी विषयी कमालीचे कळकळ होती त्याविषयीचे त्यांचे चिंतन अतिशय प्रगल्भ आणि परिपक्व होते.
  • कमाल जमीन धारणा कायदा सावकारी पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा सामूहिक शेती प्रणाली व शेतीला उद्योगाचा दर्जा राज्यातील नद्या आणि खोरे यांची विभागणी व विकास जलसंवर्धन योजना आणि पिक विमा योजना. हे सर्व त्यांनी नमूद केलेले होते त्याचे प्रतिबिंब आपणास शेतकरी विषयक कायद्यांमध्ये पुढे पुढे दिसून आले.

आजही मात्र शेतकऱ्यांना किमान हमी भाव आंदोलने करावी लागतात.

प्रत्यक्षात जगले आणि वागले म्हणून आज पर्यंत कोणी त्यांचा हात धरू शकलं नाही कोणी त्यांचं महत्त्व नाकारु शकले नाही.

जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत क्षितिज समांतर रेषेत आणि लंब रेषेत सुद्धा(horizontal and vertical) संघर्ष करीत राहिले त्यांच्याविषयी किती लिहावं आणि काय लिहावं

एकदा गांधीजी त्यांना जेव्हा म्हणाले मला सुद्धा स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेद मान्य नाही. तेव्हा त्यांनी गांधीजींना म्हटले होते जसे खादी न वापरणाऱ्यांना काँग्रेसचा सदस्य होता येत नाही तसं स्पृश्य-अस्पृश्य भेद पाळणाऱ्यांना सुद्धा काँग्रेसचा सदस्य होता येणार नाही असा आपण नियम का करत नाही ?.

ते निराशेच्या आणि गडद अंधारातही कायम सकारात्मक होते. पुरोगामी होते. ध्येयनिष्ठ आयुष्य जगले. उत्पादनक्षम आयुष्य जगले. म्हणूनच शक्तिवान ठरले .प्रत्येक मर्त्य मानव तसं जगू शकतो आणि कीर्ती रूपाने बाबासाहेबांसारखा अमर राहू शकतो असा वस्तुपाठ म्हणजे बाबासाहेबांचा आयुष्य होतं.

Dr B.R. Ambedkar was not busy but productive person in all dimensions of life.


- आश्र्विनी केशवराव गावंडे (अकोला)

लेखिका शिक्षक तसेच मुक्त पत्रकार आहेत.

Tags:    

Similar News