कंडोम तयार करणारी कंपनी मोदी सरकारने काढली विक्रीला
कंडोम तयार करणारी नफ्यात असणारी सरकारी कंपनी मोदी सरकारने विक्रीला का काढली? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण;
हिंदुस्थान लॅटेक्सचे नाव ऐकले असेल, तीच ती सुंदर कंडोम बनवणारी केंद्र सरकारच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी; १९६६ सालापासून कार्यरत आहे. तिचे नाव नंतर बदलून HLL LifeSciences असे करण्यात आले होते; वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी आहे. केरळ मध्ये थिरुअनंतपूरम स्थित ही कंपनी केंद्र सरकारने विकायला काढली आहे; १०० % मालकी हस्तांतरित होणार आहे.
केरळ सरकारने केंद्र सरकारला कॉउंटर ऑफर दिली आहे; तुम्हाला जी किंमत अपेक्षित आहे ती द्यायला आम्ही तयार आहोत; ती केरळ सरकारला विकत द्या. केरळ सरकारने त्या काळात १९ एकर जमीन या कंपनीला दिली आहे. केंद्र सरकारने औपचारिक रित्या केरळ सरकार बोली मध्ये सहभागी होऊ शकणार नाही असे कळवले आहे; कारणे माहित नाहीत. तोट्यातील सार्वजनिक उद्योग विकणार कारण किती दिवस तोटा सरकार भरून देणार असे मुद्दे मांडले जात असतात; ही तर नफ्यात असणारी कंपनी आहे.
केंद्र सरकारला येणारी अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक उद्योग विकते म्हणतात; इथे तर केरळ सरकार केंद्र सरकारला अपेक्षित किंमत देऊ इच्छिते ; तरी देखील नाही म्हणते केंद्र सरकार.
काय चालले आहे त्याची माहिती घ्या ; समजून घ्या ; विचार करा ; पोलिटिकल इकॉनॉमी समजून घ्या ; फेस व्हॅल्यू वर काहीच स्वीकारू नका.
संजीव चांदोरकर