महाराष्ट्राला न कळालेला राजा… छत्रपती संभाजी महाराज
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जयंती आणि पुण्यतिथी पलिकडे जाऊन कधी पाहिलंय का? छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम, याबरोबरच युध्दनिती कशी होती? याविषयी जेष्ठ विचारवंत डॉ. संजय सोनवणी यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त प्रसिध्द झालेला लेख आज पुण्यतिथीनिमीत्त पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.;
धर्मवीर संभाजी म्हणून आज त्यांचा गौरव आपण करत आहोत. याच्याही पलिकडे जाऊन संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांच्या खऱ्या इतिहासासोबत आपल्या समोर का येऊ दिला जात नाही. छत्रपती संभाजी संभाजी महाराजांनी इतक्या इतक्या लढाया लढल्या अशा बढाया लोक मारत असतात. मात्र, 5 लढायांची नाव विचारली तर बोलती बंद होते. असं का होतं?
छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला कळाले का? छत्रपती संभाजी महाराजांचे संघर्षमय जीवन आणि त्यांनी केलेल्या कामगिरीने पराक्रमाची हिमालया एवढी उंची असताना संभाजी राजेंबाबत नको त्या गोष्टी समाजात कोणी पसरवल्या? छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वप्न महाराष्ट्राला का कळाले नाही? त्याचबरोबर महाराष्ट्राचा बाणा कायम ठेवण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत शंभू राजांनी कसा केला? पाहा छत्रपती संभाजी राजें यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या 'मी मृत्युंजय मी संभाजी' या कांदबरीचे लेखक संजय सोनावणी यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा कट आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन संशोधनात्मक पद्धतीने मांडले आहे... पाहा हा व्हिडिओ…