जाती अंताच्या (Cast Discrimination) लढ्याची गोष्ट करताना महिला अत्याचार मागे सारून जाणं शक्यच नाही. ज्या समाज व्यवस्थेमध्ये महिलांना गुलाम ठरवलं.. त्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्र महिलांचे स्थान शुद्राहुनही शुद्र असतं.. जातीतली सोडा परंतु घरामधील हिंसा आई माईच्या उद्धारापासून सुरू होते. साने प्रकरणातील 'खिमा' आणि खैरलांजीतील (Khairlanji) 'काठी' ची नेमकी मानसिकता काय आहे? कायदा आणि प्रबोधनातून जातीअंत शक्य नाही.. अत्याचार करणाऱ्यांनाही भेटा आणि मनपरिवर्तन करा असं सांगत नवयान महा जलसाच्या शाहीर शीतल साठे(Shital Sathe) यांनी MaxMaharashtra आयोजित 'जाती तोडा माणूस जोडा' परिसंवादात मांडणी केली...