तुमचा दिवसातील निम्मा वेळ इथं जात आहे, आताच सावध व्हा...

Update: 2023-06-18 03:20 GMT

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142.86 कोटी एवढी निदर्शनात आली आहे . भारताने 142.57 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकले . आणि भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.आता जितकी लोकसंख्या तितके मोबाईल वापरण्याचे प्रमाणही जास्त ,असे सरासरी गणित जरी मांडायला गेले तर भारत प्रथम स्थानी असेल असे वाटते . पण मोबाईलच्या शर्यतीत चीन आपल्या पुढे आहे .पहिल्या तीन देशांची आकडेवारी खालीलप्रमाणे

कोणत्या देशात सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते आहेत?

१)चीन. 1.43B.

२)भारत. 1.42B.

३)संयुक्त राष्ट्र. 338.29M

मागील वर्षी २०२२ चे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार , भारतात 1.2 अब्ज मोबाइल फोन वापरकर्ते आणि 600 दशलक्ष स्मार्ट फोन वापरकर्ते होते . पण सध्या चीन यामध्ये आघाडीवर असला तरी सोशल मीडियाचा वापर करत असताना इंस्टाग्रामचा वापर करण्यात मात्र भारताने सर्व देशाने मागे टाकले आहे .इंस्टाग्रामवरील रिल्सचे तर लोकांना व्यसन लागले आहे. एक पाठोपाठ एक रील असे करत काहींचा दिवसातील निम्मा वेळ यामध्येच जातो आणि सरतेशेवटी हातात काहीच नसतं .पण याची कारणे काय ? नक्की याचा आकडा किती ? चला पाहूया ...

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा अनेकांचा प्राण बनला आहे. याआधी आपण बऱ्याचदा मोबाईल शाप कि वरदान वर बोलत होतो . पण आता सोशल मिडियाचा वापर पहिला तर आकडे भयंकर दिसतात . सोशल मीडियाचे तसे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत . त्यामध्ये फेसबुक ,इंस्टाग्राम ,ट्विटर ,युट्युब हे सर्रास वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहेत . इंस्टाग्राम आणि फेसबुक वर रिल्स आणि युट्युब वर शॉर्ट्स असे एक मिनिटाच्या आतील विडिओ असतात .ज्याची प्रचंड आवड भारतातील अनेक वापरकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे . या १ मिनिटाच्या आतील व्हिडिओमध्ये तुम्हाला मनोरंजनात्मक ,माहितीपर तसेच शैक्षणिक ,राजकीय तसेच प्रेरक विडिओ पाहायला मिळतात . या सर्व प्लॅटफॉर्म मध्ये सर्वाधिक रिल्स इंस्टाग्रामवर बनवले जातात .

इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये भारत कितव्या स्थानावर ?

इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये भारत देशाच्या क्रमवारीनुसार सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर 230 दशलक्ष लोकांसह पहिला क्रमांक भारताचा लागतो .सर्वाधिक इंस्टाग्राम वापरकर्ते असलेला देश म्हणून युनायटेड स्टेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, इंस्टाग्रामवर युनायटेड स्टेट्सच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या या प्लॅटफॉर्मचा वापर करते .ब्राझीलमध्ये 119 दशलक्ष वापरकर्ते ,इंडोनेशियामध्ये जवळपास 100 दशलक्ष आहेत. तुर्की देखील उच्च स्थानावर आहे.

सर्वाधिक इंस्टाग्राम वापरकर्ते असलेले देश:

भारत - 230 दशलक्ष

युनायटेड स्टेट्स - 159 दशलक्ष

ब्राझील - 119 दशलक्ष

रशिया - 63 दशलक्ष

तुर्की - 52 दशलक्ष

भारतातील तमाम तरुण वर्गाकडे मोबाईलची उपलब्धता सहज आहे. कोरोना काळात शिक्षण ,नोकरी ऑनलाईन झाली . त्यामुळे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांपासून नोकरी करणारे कर्मचाऱ्यांना मोबाईलवर काम करण्याची सवय लागली . यामध्ये अनेक तरुणांच्या हातात मोबाईल आले आणि सोबतच हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म .टिकटॉक सारख्या ऍपमुळे रातोरात प्रसिद्ध झालेले अनेक सामान्य मुलं आपण पाहिली आहेत .भारतात या टिकटॉक वर बंदी आल्यानंतर हा 'शॉर्ट विडिओ प्रेमी समूह' इंस्टाग्रामकडे वळला .आणि तरुणवर्गात फेसबुक पेक्षा जास्त लोकप्रियता इंस्टाग्रामला मिळाली.

यामध्ये अनेक वापरकर्ते चांगले आणि माहितीपर विडिओ बनवतात . पण फक्त प्रसिद्धीसाठी अवाजवी दिखावा करणारे अनेकजण इथे पाहायला मिळतात . यामध्ये रिल्स करणाऱ्यांची संख्या वेगळी आणि ते पाहण्यासाठी मोबाईलवर फक्त स्क्रोल करता बसणाऱ्या मंडळींची संख्या वेगळी .

मानसिकतेवर याचा परिणाम कसा होतो ?

सोशल मीडियावर आपण आपल्या आवडीचे विडिओ बघतो . आणि आवडल्यास तशी पसंतीही दर्शवतो . आणि त्यामुळे आपल्या आवडीचेच विडिओ वारंवार आपल्यला दिसायला लागतात . यातून लोकांचा संवाद थांबतो. आणि प्रत्येकजण फक्त विडिओ बघण्यात आपला वेळ घालवतो . एकाच वेळी अनेक विषयाचे आणि आशयाचे विडिओ डोळ्यासमोर येतात . नकळत मेंदूमध्ये संमिश्र अशी माहिती साठत जाते . त्यामुळे कधी कधी थकवा येऊन माणूस निरस सुद्धा होतो . किंवा झोपी जातो .याचा जर अतिवापर झाला तर त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होताना सुद्धा दिसत आहे .कित्येकांची नाती हि फक्त मोबाइलच्या अतिवापरामुळे कायमची थांबली आहेत .

एकंदरीत तंत्रज्ञान येत राहील ,पण माणसाने जर त्याचा अतिवापर केला तर "अति तिथे माती "हे अटळ आहे . त्यामुळे वेळीच अश्या सवयींना आवर घालणं आवश्यक आहे .

Tags:    

Similar News