कोरोनाच्या संकटकाळात थेट मैदानात उतरुन नागरिकांपर्यंत बातम्या पोहोचवणाऱ्या पत्रकारांपैकी अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी बहुतांश पत्रकार हे टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारे आहेत. तर यामध्ये काही कॅमेरामन आणि त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सचाही समावेश आहे. वर्तमान पत्रांच्या काही फोटोग्राफर्सचाही यामध्ये समावेश आहे. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने केलेल्या चाचण्यांमध्ये हे पत्रकार कोरोनाबाधीत असल्याचे सिद्ध झाले.