देशात कोरोना व्हायरस चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात मध्ये 1367 रुग्ण आढळले असून त्यातील 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाणाचा विचार केला तर राज्यात सर्वांधिक रुग्ण 41 ते 50 वर्ष वयोगटातील आहे. या रुग्णांची संख्या 168 आहे. वयाचा विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस ची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्याचबरोबर जर्नल ऑफ मेडिकल सायन्स च्या माहिती नुसार लहान मुलांमध्येही कोरोना चा प्रसार झाला असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र सरकार च्या अहवालानुसार 1 ते 10 वर्षे वयोगटातील 21 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर 11 ते 20 वर्षे वयोगटामधील 56 तरुणांना कोरोनाची लागण झाल्याचं या अहवालावरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळं पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.
वयोगटानुसार कोरोना च्या रुग्णांची संख्या....