२० एप्रिलनंतर ग्रीन झोनमधील उद्योग आणि काही व्यवसाय सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण देशभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरूवारी दिवसभरात देशातली स्थिती काय होती ते पाहूया...
कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी अजून दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरूवारी दिवसभरात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आता ही संख्या १२ हजार ७५९ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ४२०वर पोहोचली आहे. दरम्यान १ हजार ५१४ रुग्णांना आतापर्यंत डिसार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३ हजार २०२ रुग्ण आढळले आहेत. तर त्यापैकी १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० रुग्ण कोरोनामधून बरे झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुरूवाकी कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २८६ ने वाढली तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.