रत्नागिरी अविरत मुसळधार पावसामुळे जवळपास 4,500 घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे, या अतिवृष्टीमुळे राज्यासमोरील आणखी आव्हाने वाढली आहेत. पुढील चार दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असुन अतिवृष्टीमुळे सर्व यंत्रणा हाय अलर्टवर असल्याचे अधिकाऱ्यांनी ,सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीने सकाळी ७ वाजेच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व रहिवाशांना या कठीण काळात सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.