विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्टचे आदेश

Update: 2023-11-27 13:17 GMT

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी कोसळणाऱ्य पावसामुळे आणि होणाऱ्या गारपिटीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे .तसेच नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली असुन. असेच दृश्य कोकणात आणि सातारा येथे ही पाहायला मिळत आहे. तर आज सोमवारी विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे व ऑरेंज अलर्ट जारी करण्याचे आदेश देण्यात दिले आहेत.

आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘यलो अलर्ट’देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Tags:    

Similar News