बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्याविरोधात नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
नवी मुंबईत (Navi Mumbai Police) पोलिसांनी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्याविरोधात मोठी कारवाई करत अटक केली आहे. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाक्याजवळील (Kharpada) वैष्णवी हॉटेल येथे एक व्यक्ती बिबट्याच्या कातडीची विक्री करणार असल्याची माहिती पनवेलच्या (Panvel) गुन्हे शाखेला मिळाली. यामध्ये मिळालेल्या माहितीची शहानिशा करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील (Sr, PI Ravindr Patil) यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांचे पथक छाप्यासाठी रवाना झाले. त्यावेळी एक व्यक्ती खांद्यावर बॅग अडकून खारपाडा ब्रीजच्या बाजूने टोकनाक्याकडे येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी थेट त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे असलेली बॅग ताब्यात घेतली. जितेंद्र खोतू पवार असे नाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये बिबट्याची कातडी ताब्यात घेण्यात आली.