महाराष्ट्रात आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचं सत्र चालुच होतं परंतु मुंबई ही मागील पाच दिवस ऑरेंज अलर्टवर होती. आज मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा महाविद्यांलयांना देखील सुट्टी देण्यात आली असुन, आज होणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. तसंच वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे तर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्येही 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे