Mumbai Air Pollution ; दूषित हवेचा नागरिकांवर होतोय परिणाम

Update: 2023-10-20 03:21 GMT

Mumbai Pollution : दिल्ली पाठोपाठ आता मुंबई आणि पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे. आज देखील मुंबईत हवामान खराब आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. फुफुस, दमा, श्वास हृदयाच्या आजारात वाढ देखील येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे. यावर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी चेंबूर येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. पाहूयात विद्यार्थी काय म्हणतात सकाळची हवा आणि होणारा त्रास यासंदर्भात 

मुंबई सायन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 195 AQI तर सर्वाधिक अंधेरी चकाला परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 389 AQI अत्यंत खराब हवामान असल्याचं समोर आलं आहे. दरम्यानं यावर काही विद्यार्थ्यांना त्यांना दैनदिन जीवनाविषयी विचारलं असता ते म्हणाले सकाळी लवकर शाळेत याव लागत. त्यामुळे ५ वाजता उठावं लागत थोडावेळ मॉर्निग वॉक, योगा, रनिंग करतो त्या नंतर शाळेत यायला निघतो. सकाळच वातावरण असते रस्त्याला धुक असंत परंतू या वातावरणात पण घाम येतं असतो श्वास घ्यायला त्रास होत असल्यांच काही विद्यार्थ्यांनी सांगितले. तर या हवेच्या दुषपरिणामामुळे आजचा लोक आजारी पडत आहे. आम्ही दोन दिवसापूर्वीच मुलांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. या वातावरणात आजारपण वाढण्याची शक्यता देखीलं येथील शिक्षकांनी व्यक्त केली तर रस्ते खड्डे मुक्त केलें, औद्योगिकरण इतर ठिकाणी हलवणे किंवा झाडे लावणे, डिजेल, पेट्रोल वाहनांना पेक्षा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर केला पाहिजे तरचं मुंबईतीलं हवामान सुधारेल असं वक्तव्य शिक्षकांनी केलं आहे

Full View

Tags:    

Similar News