बीड जिल्ह्यात कमी पाऊस ; विहिरी, तलाव कोरडे

Update: 2023-07-27 07:45 GMT

बीड - २७ जुलै जिल्ह्यात गेले काही दिवसापासून पाऊस नसल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र रिमझिम पावसाने बीड जिल्ह्यात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांना त्याचा चांगलाच आधार मिळाला आहे. मात्र मोठा पाऊस नसल्याने ज्या विहिरी, तलाव मात्र कोरडेच आहेत. येणाऱ्या काळात समाधानकारक असा पाऊस पडल्यास भविष्यात शेतीसाठी लागणारे पाणी त्याचबरोबर पिण्यासाठी लागणारे पाणी यासाठी दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


Full View

Tags:    

Similar News