जयंती चित्रपट आता OTT वर दाखल, इथे पाहता येणार चित्रपट

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहात गर्दी खेचणारा जयंती चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालत आहे.;

Update: 2022-07-20 01:38 GMT

शैलेश नरवाडे लिखित आणि दिग्दर्शित जयंती चित्रपटाने तुफान गर्दी जमवली होती. विशेष म्हणजे कोव्हडच्या दुसऱ्या लाटेच्या भयंकर उन्मादानंतर या चित्रपटाने ग्रामीण भागातील प्रेक्षकांना सुद्धा चित्रपटगृहात खेचून आणले होते. बॉक्स ऑफिसवरील जबरदस्त कामगिरीनंतर हा चित्रपट आता OTT माध्यमांवर देखील आला आहे. amazon prime  या OTT माध्यमावर हा चित्रपट मराठी सोबतच हिंदीतही डब करून उपलब्ध करण्यात आला आहे.

यासोबतच या चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये देखील दबदबा राहिला. चित्रपटात संत्या ही मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे याला सर्वोत्कृष्ट नायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर या चित्रपटातील नायिकेची भूमिका साकारलेली तीतिक्षा तावडे  हिने देखील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाबास मित्थू या  हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

OTT वरदेखील  या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रेक्षक चित्रपट पाहून त्यांच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मांडत आहेत.

Tags:    

Similar News