Air Pollution : मुंबईतील प्रदूषणात वाढ ; महापालिका बसवणार धुळ अटकाव करणारी यंत्रणा

Update: 2023-10-27 03:27 GMT

Air Pollution : मुंबईतील प्रदूषणात वाढ ; महापालिका बसवणार धुळ अटकाव करणारी यंत्रणा

Mumbai Air Pollution : हवा बदल आणि धुळीमुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. सायन - चेंबुर परिसरात आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवेचा निर्देशांक 191 AQi येवढा असल्याने आजही या प्रदुषीत हवेचा मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. दरम्यानं हवा शुद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका पाच ठिकाणी यंत्रणा उभारणार आहे. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे पहिले मशिन येत्या महिनाभरात बसवली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामुळे हवेचा दर्जा ३० ते ७० टक्क्यांपर्यंत सुधारण्यास मदत मिळणार असून या सर्व मशिनचा खर्च चार कोटी रूपयांपर्यंत आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली इमारतींची बांधकामे, मेट्रो, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सागरी किनारा मार्गाची कामे, वाहनांची वाढणारी संख्या इत्यादींमुळे हवेच्या प्रदूषणा वाढ झाली आहे. त्यामुळे श्वसनाचे त्रास, खोकला इत्यादींचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. यासाठी आता मुंबई महापालिकेकडून धुळीला अटकाव करून प्रदूषण रोखण्यासाठी नवीन यंत्रणाही आणल्या जात आहेत. यामध्ये हवेचे निरीक्षण करणाऱ्या आणि ती शुद्ध करणाऱ्या मशिनचा समावेश आहे. संबंधित परिसरातील वायुप्रदूषण किती आहे, याचे निरीक्षण एका मशिनद्वारे केले जाईल आणि त्यानंतर उर्वरित दोन मशिनमधून अशुद्ध हवेवर प्रक्रिया केली जाईल. हवा मशिनमध्ये गेल्यानंतर त्यावर दोन टप्प्यांत त्वरीत प्रक्रिया होईल. यामध्ये धुळीचे कण काढून शुद्ध हवा बाहेर पडेल. धुळीला अटकाव करून शुद्ध हवा तयार करणारी यंत्रणा मुंबईतील मानखुर्द, दहिसर, हाजीअली, कलानगर, मुलुंड चेकनाका आदी पाच ठिकाणी एकूण १५ मशिन बसवल्या जाणार आहेत.


Full View


Tags:    

Similar News