नव्या वर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

Update: 2023-12-27 03:38 GMT

भारतीय हवामान विभागाने (IMD ) वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला राज्यातील काही भागात पाऊसाची श्यक्यता वर्तवली आहे.

एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट (Cold Weather) होताना दिसत आहे, दुसरीकडे हवामान खात्याने (IMD) पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाची शक्यता

वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमधील पूर ओसरला असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहे. महाराष्ट्रासह गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या ठिकाणी वर्षअखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता आहे.

Tags:    

Similar News