राज्यात हवामानत बदल झाला असून काल काही भागात पाऊसाने हजेरी लावली आहे. राज्यातील मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी.ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संयोगातून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन दिवस पावसाचा अंदाज असून १३ जानेवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात किरकोळ पाऊसही पडला. सायंकाळनंतर वारे वाहत असल्याने गारवा होता.अनेक शहरात थंडीचे धुक्याची चादर ओढली होती.