Mumbai Air Pollution ; मुंबईची हवा खराब ; मास्क वापरण्याचं पालिकेचं आवाहन

Update: 2023-10-19 05:00 GMT

Mumbai Air Pollution ; मुंबईची हवा खराब ; मास्क वापरण्याचं पालिकेचं आवाहन

Mumbai Pollution : मुंबई आणि पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे. आज देखील मुंबईत हवामान खराब आहे. तर पुण्यात देखील प्रदूषण वाढले आहे. यामुळे मुंबईसह पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Mumbai Air Pollution : दिल्ली, पाठोपाठ आता मुंबई पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. पुणे आणि मुंबई याठिकाणी वायू प्रदुषणात वाढ झाली. येथील नागरिकांचा आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचं मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केलं आहे. मुंबई सायन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 195 AQI तर सर्वाधिक अंधेरी चकाला परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 389 AQI अत्यंत खराब हवामान असल्याचं समोर आलं आहे. यामुळे फुफ्फुस, दमा आणि हृदयाचे आजार असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होणार आहे. यावर काँग्रेसचे माजी महापौर रवी राजा यांनी एक्स पोस्ट केली आहे.

दरम्यानं रवी राज म्हणाले की " मागच्या वर्षीही शहरात हवेच्या गुणवत्तेची समान पातळी दिसून आली होती, परंतु नेहमीप्रमाणे ते मागील अनुभवातून काहीच शिकले नाहीत". अशी टीका यावेळी त्यांनी केली. "बीएमसीच्या प्रशासकाने प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रे बसवण्याबाबत बोलले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली त्याचं काय झाले? असा सवाल देखील रवी राज यांनी उपस्थित केला आहे

दरम्यान त्यात वाढलेली वाहन संख्या यामुळे देखील प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे दमा, टीबी, कँसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.




Tags:    

Similar News