Eknath Shinde : शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; राज्यपालांच्या अडचणीतही वाढ...
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा गेल्या ब-याच दिवसांपासुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावरून एकनाथ शिंदे गटाला धक्का दिला आहे. तसेच राज्यपालही यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा गेल्या ब-याच दिवसांपासुण सर्वोच्च न्यायालयात आहे. आज सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावरून एकनाथ शिंदे गटाला धक्का दिला आहे. तसेच राज्यपालही यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकराने राज्यपाल नियुक्तीसाठी १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र त्यावर तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून दीड वर्ष काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर नव्याने १२ आमदारांची नियुक्त करण्याचं नियोजन केले होते. मात्र या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या मनाईमुळे राज्यपालही अडचणीत आले असून त्यांना आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
ब्रेकिंग
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) September 27, 2022
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुकती करण्यास सुप्रीम कोर्टाने केली मनाई
या प्रकरणी सुनावणी नंतर कोर्टाने कोणतीही कारवाई सरकारने करू नये असे आदेश दिले
दरम्यान शिवसेना नेमकी कोणाची या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह याचा निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायलायाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे. मात्र न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावर शिंदे सरकारला धक्का दिला आहे.