महार ते ब्राह्मण सगळेच मराठा, बच्चू कडूंनी इतिहास सांगितला, सभागृह थक्क झालं
मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर महाराष्ट्रात ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष रस्त्यावर पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणात जात ही किती घट्ट रूजलीय, याचा लेखाजोखाच तत्कालीन आमदार बच्चू कडूंनी २०२३ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलतांना मांडला. मराठा ही जात नसून समूहवाचक शब्द असल्याचं बच्चू कडूंनी ठणकावून सांगत काही ऐतिहासिक संदर्भ दिले. बच्चू कडूंचं साधारणतः ३० मिनिटांचं हे भाषण सभागृह थक्क होऊन ऐकत होतं...