महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमीत्ताने फोन उचलल्यानंतर हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देतांना त्यांनी वंदे मातरम् म्हटलं तर आम्ही राम-राम आणि जय बळीराजा घोषणा देऊ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसंच पुढे बोलताना पोलिसांवर दबाव टाकून राजकीय पक्षाचे काम करायला लावले जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.