राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा दबदबा जितका राजकीय वर्तुळात आहे तितकाच तो क्रिकेट (Cricket) विश्वात देखील आहे. अनेक वर्ष ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट निमायक (ICC) चे अध्यक्ष राहिले आहेत. त्याच्याच पावलावर आता आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी देखील पाऊल टाकले आहे. शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी बाजी मारत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार यांचे भाचे जावई असणारे विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक व नातू रोहित पवार हे दोघेही रिगणात होते, या आधीची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणुक वादाच्या भोऱ्यात अडकली होती, त्यामुळे ती निवडणुकीत न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असतानाच या निकालापूर्वीच ही निवडणुक घेण्यात आली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्याचा कार्यकाळ संपत आलेल्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकी लढवता येणार नव्हती, त्यामुळे सत्तारुढ गटाचे सर्वच उमेदवारांना निवडणुक लढवता येणार नव्हती. त्यात आता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत आमदार रोहित पवार यांनी बाजी मारली आहे.