मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? मोदी-शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तीन आठवडे उलटून गेले. मात्र राज्यात अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही तासांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. य़ा दौऱ्यात राजधानी दिल्ली येथे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आणि नव्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे केंद्रातील बडे नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे-फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची चर्चा फेटाळून लावली.
तसेच फडणवीस यावेळी म्हणाले की, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आणि नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. तर या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही याठिकाणी आलो होतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली असली तरी मंत्रीमंडळ विस्ताराविषयी चर्चा झाली नाही.
तसेच सरकारच्या वैधतेबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, आम्ही आमची बाजू जोरदारपणे मांडत आहोत. त्यामुळे न्यायालय योग्यच निर्णय देईल.
यावेळी ज्येष्ठांनी वाढदिवसानिमीत्त आशिर्वाद दिले तर इतर सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचेही देवंद्र फडणवीस म्हणाले.