जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट – अजित पवार
बुधवारी सकाळी साडेआठच्या आसपास विरोधीपक्ष नेते अजित पवार (leader Ajit Pawar) दस्तुरखुद्द जे जे इस्पितळात पोहचले.मंगळवारी विधानसभा परिसरात उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांनी स्वतः ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार पोहचले होते.त्यावेळी स्वागताला इस्पितळात कुत्र्यांचा सर्रास वावर असल्याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्या नंतर बोलत होते.
मी सकाळी साडेआठ वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये गेलो. गेटवरही कुत्र्यांचा सुळसुळाट होता. आत मध्ये गेलो तेव्हाही लॉबीमध्ये कुत्रे घुटमळत असल्याचे मला दिसून आलं.
महाविकास आघाडी सरकार असताना मी जे जे इस्पितळात कधीच गेलो नव्हतो अन्यथा मी नक्कीच काही तरी केले असते असा खेद व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती केली.शेतकरी सुभाष देशमुख यांच्या तब्बेती बद्दल विचारपूस करून त्यांच्या कुटुंबातील मुलगी सीए जावई इंजिनिअर आणि मुलगा चांगल्या कम्पनीत एच आर ची नोकरी करत असताना देखील आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला असावा याचा विचार करावा असे देखील मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून अजित पवार बोलले.
अभ्यागत समिती स्थापन करा – विधानसभा अध्यक्ष
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील विरोधीपक्ष नेत्यांच्या विचारांशी सहमती दर्शवली व सरकार ला निर्देश दिले की याकडे लक्ष द्यावे व गेली अडीच वर्षेपासून स्थानिक लोकप्रतिनिधीना घेऊन तयार करावयाची अभ्यागत समिती तयार झालेली नाही ती समिती लवकरात लवकर गठीत व्हावी असे निर्देशच विधानसभा अध्यक्षांनी दिले.यामुळे इस्पितळ प्रशासनाने काय करावे यावर अंकुश राहील.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः माझ्या विधानसभा क्षेत्रात सेंट जॉर्ज आणि जी.टी. हॉस्पिटल येते याची आठवण करून दिली.