हीच ती वेळ म्हणत आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

Update: 2022-07-16 06:19 GMT

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा हादरा बसला. यामध्ये शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. तर त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रेला सुरूवात केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला पुन्हा उभं करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या भेटी घेत निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरग्रस्तांना मदत पुरवण्यावरून विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात आहे. त्यापार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा. सर्वसामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ", असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

Tags:    

Similar News