शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या विरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र हि तक्रार कोणत्या कारणांसाठी दाखल करण्यात आली, यासाठी ही बातमी नक्की वाचा...;

Update: 2023-03-02 07:12 GMT

मुंबईतील रहिवासी असलेल्या किरीट जसवंत शाह नावाच्या एका व्यक्तीने लखनऊमधील तुलसियानी या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला होता. त्यांना ८६ लाख रुपये देऊनही आत्तापर्यत त्यांना फ्लॅट मिळालेला नसल्याचा दावा शाह यांनी केला आहे आणि गौरी खान (Gauri Khan) या तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स लिमिटेडची (Tulsiani Construction and Developers Limited) ब्रँन्ड अॅम्बेसेडर आहेत. याप्रकरणी गौरी खान (Gauri Khan) यांच्यावर शाह यांनी पैसे हडप केल्याचा आरोप करत लखनऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गौरी खान (Gauri Khan) यांच्या विरुद्ध आयपीसी कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा 'पठाण' (Pathan) चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यावधीचे उड्डाण घेत आहे. तर दुसरीकडे त्यांची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्यावर लखनऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शाहरुख 'पठाण' चे सेलिब्रेशन करत असताना त्यांच्यासाठी हि वाईट बातमी समोर आली आहे, गौरी खानसह ३ जणांविरुद्ध विरोधात उत्तर प्रदेशमधील लखनऊ इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपर्स लिमिटेडचे (Tulsiani Construction and Developers Limited) सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे, ब्रॅन्ड अॅम्बेसेडर गौरी खानने (Gauri Khan) केलेल्या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन आपण हा फ्लॅट घेतल्याचे तक्रारकर्त्यानी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.  

Tags:    

Similar News