Sushmita Sen heart attack : अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, चाहत्यांना धक्का
Sushmita Sen heart attack : सुष्मिता सेनेला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.;
Sushmita Sen heart attack : सुष्मिता सेनेला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या काही दिवसांपुर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती सुष्मिता सेनने इंस्टाग्राम (Sushmita sen instagram post) पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
या पोस्टमध्ये सुष्मिता सेनने लिहीले आहे की, गेल्या काही दिवसांपुर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर माझी एन्जिओप्लास्टी (angioplasty) झाली. मात्र सध्या मी एकदम ठीक असून जीवन जगण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
पुढे सुष्मिता सेनने म्हटले आहे की, आपलं हृदय खूश आणि हिंमतीने भरून ठेवले आहे. तुमचं हृदय तुमच्यासोबत तेव्हा असेल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल. या ज्ञानाच्या गोष्टी माझ्या वडिलांनी सांगितल्या होत्या. मला गेल्या काही दिवसांपुर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. आता एन्जिओप्लास्टी झाली आहे. स्टेंट लावणअयात आला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे माझ्या हृदयविकार तज्ज्ञाने म्हटले आहे की, तुमचे हृदय मोठे आहे.
अनेक लोकांनी मला मदत केल्याबद्दल आणि योग्य पाऊल उचलल्याबद्दल आभार. हे मी दुसऱ्या पोस्टमध्ये सांगणार आहे. ही पोस्ट माझ्या शुभचिंतकांसाठी असल्याचे सुष्मिता सेनने म्हटले आहे.