‘नुक्कड़’चा फेम समीर खाखर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन
दूरदर्शनच्या 'नुक्कड' (Nukkad) या लोकप्रिय मालिकेत 'खोपडी'ची (KHOPDI) व्यक्तिरेखा साकारून घराघरात ओळख निर्माण झालेला अभिनेता 'समीर खाखर' (Sameer Khakhar) यांचं निधन झालं आहे. समीर खाखर यांना श्वसनाचा त्रास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. काल दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर समीरला बोरिवलीच्या एमएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तो जीवनाची लढाई हरला.;
ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयोमानानुसार वैद्यकीय आजारामुळे त्यांना अनेक दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यानंतर समीर खाखर यांना बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अभिनेत्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर समीर खाखर यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते दु:खी झाले आहेत. समीर खाखर यांच्या निधनाने चाहते आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
समीर खाखर यांनी चार दशकापर्यंत इंडस्ट्रीमध्ये काम केले आहेत. मधल्या काळात त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतला आणि अमेरिकेत स्थायिक झाला. काही काळानंतर, अभिनेता परत आला आणि त्याने दोन गुजराती नाटकांमध्ये काम केले. त्यांनी 'सलमान खान' (Salman Khan) सोबत 'जय हो' (JAI HO) या चित्रपटात देखील काम केले होते. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता त्यानंतर समीर खाखर यांनी कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. समीर खाखर टीव्हीवरही काम करताना तितकेच सक्रिय होते.
समीर खाखर हा शेवटचा टीव्ही शो 'संजीवनी'मध्ये (sanjeevani) दिसले होता. या शोमध्ये 'सुरभी चंदना' (Surbhi Chandna) आणि 'नमित खन्ना' (Namit Khanna) मुख्य भूमिकेत होते. समीर खाखर यांची टिव्ही करीयरची सुरुवात 'ये जो है जिंदगी' (Ye Jo Hai Zindagi) यापासुन झाली होती. यामध्ये त्यांनी एका एपिसोडमध्ये डिटेक्टिवची भुमीका मांडली होती. खरंतर लोकांना असे वाटत की त्यांच्या करीयरची सुरुवात नुक्कड पासुन झाली आहे. नुक्कडमध्ये समीरने खोपडीया भूमिकेत दिसले होते. ही भुमीका लोकांना खुप आवडली.
समीर खाखर यांनी नुक्कड व्यतिरिक्त सर्कस (Circus), मनोरंजन, श्रीमान-श्रीमती, अदालत (ADAALAT) यामध्ये काम केले. वे हसी ते फसी, पटेल की पंजाबी शादी, पुष्पक, दिलवाले (Dilwale), राजा बाबू, परींदा (Parinda) आणि शहंशाह (Shahenshah) यासारख्या चित्रपटात काम केले आहे. हिंदी चित्रपट आणि धारावाई व्यतिरिक्त गुजराती थिएटरमध्ये त्यांची महत्वाची भुमिका आहे. समीर खाखर जेव्हा जेव्हा पडद्यावर आले तेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याच्या दमदार अभिनयाचे वेड लागले. त्याच्या अभिनय व्यक्तिरेखेशी जुळवून घेणं सगळ्यांनाच सोपं नव्हतं. समीर खाखर आता आपल्यात नसतील तरी पण त्यांची ही प्रतिष्ठित व्यक्तिरेखा चाहत्यांना नेहमीच आवडेल.