#Monsoon महाराष्ट्रात झेपावला : पुढील तीन दिवसात सर्वत्र पाऊस

मान्सूनचे आगमन झाले असले तरी पाऊस का पडत नाही, याचे उत्तर येत्या दोन तीन दिवसात मिळणार आहे. मान्सून आता सक्रीय होत असून महाराष्ट्राला काबीज करून मान्सून पुढे झेपावला आहे, पुढील तीन दिवसात सर्वत्र मध्यम पाऊस असेल, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी सांगितले.

Update: 2022-06-17 13:56 GMT

मान्सूनची झेपसीमा देशाच्या पोरबंदर भावनगर खांडवा गोंदिया दुर्ग भवानीपाटना कालिंगपटनम मालदा मोतिहारी ह्या शहरातून जाते. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीकडे व भुभागावर पश्चिमेकडून  ताकदवार समुद्री वारे झेपावत आहेत.

केरळ, कर्नाटक व त्यांच्या कोकणपट्टीत होत असलेला जबरदस्त पाऊस ह्यातून मोसमी वाऱ्यांना सह्याद्री ओलांडण्यासाठी मिळू शकणाऱ्या ताकदीमुळे येत्या  २-३ दिवसात मान्सून सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे. विशेषतः दि. २०,२१,२२ जुन रोजी संपूर्ण कोकणासहीत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

सध्या एमजेओ साखळी साठी जरी सध्याचे १०-१२ दिवस अनुकूल वाटत नसले तरी  जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २९ जून ते ६ जुलै दरम्यान भारतीय समुद्रा(फेज २ व ३)मध्ये ह्या साखळीची सक्रियतेता काहीशी जाणवून ती मान्सूनला  मदत करू शकते असे दिसते. ह्या दरम्यानच  मुंबईसह कोकणातही धुंवाधार तर उर्वरित महाराष्ट्रातही सदर कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

आय.ओ.डी तटस्थ असून 'ला-निना ' हि अनुकूल असुन मोसमी पाऊस भाकीताप्रमाणे कोसळणारच आहे.खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण असुन पाऊसही होणारच असुन वेळेतच चांगल्या ओलीवर नक्कीच पेरण्या होवु शकतात. फक्त शेतकऱ्यांनी संयम ठेवून धुळपेरण्या करू नये असे आवाहन खुळे यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वीच कपाशी, सोयाबीन, व टोमॅटो लागवडी केल्यात त्यांचाही अभ्यास आणि अनुभवासाठी कानोसा घ्यावा, असेही वाटते.

उत्तर भारतातील ज. काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंदीगड दिल्लीसहित भागात पश्चिम प्रकोपामुळे काही दिवसापासून होत असलेला जोरदार अवकाळी पाऊस अजूनही पुढील आठवड्यापर्यंतही  कोसळू शकतो.

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.), IMD Pune.

ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.

Tags:    

Similar News