जगभरातील फॅशन डिझाईनर्ससाठी महत्त्वाचा असणारा इव्हेंट Met Gala 2023

जगभरातील फॅशन डिझाईनर्ससाठी महत्त्वाचा असणारा 'मेट गाला इव्हेंट' (Met Gala 2023) नुकताच पार पडला. Hollywood celebreties प्रमाणे या पुरस्कार सोहळ्यात bollywood मधील Priyanka Chopra) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Update: 2023-05-03 13:57 GMT

जगभरातील फॅशन डिझाईनर्ससाठी महत्त्वाचा असणारा 'मेट गाला इव्हेंट' (Met Gala 2023) नुकताच पार पडला. Hollywood celebreties प्रमाणे या पुरस्कार सोहळ्यात bollywood मधील Priyanka Chopra) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.




 


मेट गाला इव्हेंट' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. 'मेट गाला इव्हेंट'च्या माध्यमातून आलियाने हॉलिवूडकरांना घायाळ केलं आहे. आलियाचे रेड कार्पेटवरील पांढऱ्या मोत्यांचा गाऊन परिधान केलेले फोटो व्हायरल होत आहेत. आलिया पहिल्यांदाच 'मेट गाला इव्हेंट'मध्ये सहभागी झाली होती. 




 



 


बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ पाडणाऱ्या प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता. तिचा किलर अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'मेट गाला इव्हेंट'मध्ये प्रियांकाने निक जोनाससोबत हजेरी लावली. इव्हेंट'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने खास हिऱ्यांचा हारदेखील घातला होता.


 




 



'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाने 11.6 कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता. या हाराची किंमत 204 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे आलिया भट्टने घातलेल्या गाउनवर 1 लाख मोती होते. त्यामुळे तिनेदेखील या इव्हेंटसाठी कोट्यवधी रुपयांचा गाउन परिधान केला असल्याचं समोर आलं आहे.




 


Tags:    

Similar News