Kartik Aaryan: कार्तिक आर्यनही लवकरच लग्नबंधनात गुंतणार, व्हिडिओ व्हायरल

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या हिंदी चित्रपटसृष्टीचा उगवता स्टार आहे. गेल्या वर्षी अभिनेत्याचा 'भूल भुलैया 2'(Bhool Bhulaiyaa 2) सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. कार्तिकने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कार्तिक आर्यनबद्दल नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. मात्र, ही बातमी चित्रपटाची नसून कार्तिकच्या लग्नाची आहे. आता कार्तिक आर्यनही सिंघलवरुन मिंगलच्या लिस्टमध्ये मिसळणार असल्याची बातमी समोर आली आहे.;

Update: 2023-03-19 11:48 GMT

आजकाल बी टाऊनचे अनेक स्टार्स लग्नबंधनात अडकलेले आहेत. त्यामध्ये अलिकडेच 'सिद्धार्थ मल्होत्रा' (Siddharth Malhotra)​​आणि 'कियारा अडवाणी' (Kiara Advani), 'अभिषेक पाठक' (Abhishek Pathak) यांनीही लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते, ज्यांना चाहत्यांनीही खुप पसंती दिली होती. आता कार्तिक आर्यनही घोड्यावर स्वार होणार असल्याची बातमी आहे. हे आम्ही म्हणत नसून, कार्तिकनेच हे सांगितले आहे. आता कार्तिक आर्यंन पुन्हा अकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कोणत्या चित्रपटामुळे नाही तर चक्क त्याच्या लग्न विषयावरुन चर्चेत आहे.

अलिकडेच एका कार्यक्रमात कार्तिक आर्यंन त्याच्या लग्नाचा खुलासा केला आहे. ते ऐकुन चाहते खुप खुश झाले आहेत. लवकरच कार्तिक आर्यन (Karthik Aryan) घोड्यावर चढणार असल्याच कार्तिकने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितल आहे. कार्तिक आर्यनने 'झी सिने अवॉर्ड्स'च्या (Zee Cine Awards) मंचावर धमाकेदार बँडसह प्रवेश करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक म्हणतो तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी हा बँड का आणला आहे, आता इंडस्ट्रीत बरेच लोक बँड वाजवतात, याचा अर्थ लोक लग्न करत आहेत. सगळ्यांची विकेट पडत आहेत आता मी एकटा आहे मलाही लग्नाचा लाडू खायचा आहे. त्यामुळे मी या मंचावरील सर्वांना सांगू इच्छितो की मी लवकरच घोड्यावर चढणार आहे आणि लग्न करणार आहे.

मात्र, कार्तिकच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्वजण खूप हसु लागतात. चाहते या व्हडीओला खुप पसंद दाखवत आहे आणि कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. कार्तिकचे नाव आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सध्या तो हृतिक रोशनची बहीण 'पश्मीना' (Pashmina) हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. कार्तिक लवकरच 'आशिकी 3' (Aashiqui 3) आणि 'सत्यप्रेम की कथा'मध्ये (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे.

Tags:    

Similar News