ते' ऐकून रात्री झोप येत नाही, आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं : शरद पवार

माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे, तिचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे," असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी 81 व्या वाढदिवसा दिवशी आयोजित कार्यक्रमात सांगितलं.

Update: 2021-12-12 12:27 GMT

"माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे, तिचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे," असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी 81 व्या वाढदिवसा दिवशी आयोजित कार्यक्रमात सांगितलं.

 




 


आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला."मोतीलाल राठोड या कवीने आपल्या पाथरट कवितेत सांगितलं की, हा मोठा दगड आम्ही घेतला, आमच्या घामाने, कष्टाने, हातातील छन्नीने आणि हातोड्याने त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर करतो. यानंतर सगळं गाव आलं आणि वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित केली. त्यापूर्वी माझ्याकडं कुणी ढुंकूनही पाहत नव्हतं."

 


शरद पवार म्हणाले, "अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं वाटतं. आपण काही केलं असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे."




 


शाहू - फुले - आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असंही पवार यांनी सांगितलं.आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करतोय. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा पक्ष आहे असं शरद पवार म्हणाले.

लिहिणारे, वाचणारे, अभ्यास करणारे, लिखाण करणारे लोक सध्या फार आहेत. दिनदुबळ्यांचं, पददलितांचं, वंचितांचं दुःख ऐकून आमच्या पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो असेही शरद पवार यांनी सांगितले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता याची माहितीही त्यांनी दिली.समाजकारण, राजकारण बदलत आहे परंतु महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.

 


आपल्या भाषणात शरद पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. तर इतर घटनांचा उहापोहही यावेळी केला.आपल्या समाजातील उपेक्षित घटकांवर अनेक अत्याचार आणि अन्याय होतात. त्यामुळे त्याबद्दल या तरुणांमध्ये मनात अस्वस्थता असते, असंही निरिक्षण पवारांनी व्यक्त केलं.

"मी अनेकदा संध्याकाळी गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवली आहे. त्याच्या मनात किती अस्वस्थता आहे, अन्याय-अत्याचाराबाबत ते काय विचार करतात हे यामुळे ऐकायला मिळते. आपण समाजकारण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत याचा विचार या निमित्ताने होतो," असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

Full View

Tags:    

Similar News