भारताच्या आधी चंद्रावर रशियाचं स्पेसक्राफ्ट लुना पोहचणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र रशियाचे स्पेसक्राफ्ट चंद्रावर कोसळल्याने रशियाची मिशन फेल ठरलं आहे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बलाढ्य असलेल्या रशियाने मिशन मूनच्या माध्यमातून भारताच्या आधी चंद्रावर पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र रशियाचं स्पेसक्राफ्ट चंद्रावर कोसळल्याने रशियाच्या उद्दिष्टालाच हादरा बसला आहे.
रशियाचे लुना हे स्पेसक्राफ्ट 22 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहचणार होते. मात्र त्यापुर्वीच हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून फेल ठरलं आहे.
रशियाने 47 वर्षानंतर चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं. त्यामुळे रशियाच्या मिशन मूनची जगभर चर्चा रंगली होती. रशियाने 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांच्या आसपास अमूर ओब्लास्ट वोस्तोनी कॉस्मोड्रोम येथून Luna – 25 Lander Mission लाँच केले होते. यासाठी सोयुज 2.1 बी रॉकेटचा वापर केला होता. ही मोहिम लूना-ग्लोब मिशनच्या नावानेही ओळखले जात होते.
रॉकेटचे वैशिष्ट्ये
या रॉकेटची लांबी 46.3 मीटर
रॉकेटचा व्यास 10.3 मीटर
या यानाचे वजन 313 टन
चार सटेजच्या रॉकेटने Luna-25 लँडरला पृध्वीच्या कक्षेबाहेर एका गोलाकार कक्षेत सोडले. त्यानंतर या यानाने 5 दिवसांचा प्रवास करून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. हे यान 22 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहचणार होते. मात्र त्यापुर्वीच रशियाचे लुना-25 हे स्पेसक्राफ्ट कोसळले.
भारताच्या चंद्रयानाची वैशिष्ट्ये
रॉकेट - LVM3 - M4
14 जुलै 2023 रोजी चंद्रयान ३ चे प्रक्षेपण
चंद्रयान ३ मोहिमेचं बजेट- 615 कोटी
चंद्रावर यशस्वीरित्या यान लँड करणे
चंद्राच्या पृष्ठभागावर संचार करण्याची रोव्हरची क्षमता दर्शवणे
वैज्ञानिक निरीक्षण नोंदवणे
भारताचं मिशन चंद्रयान ३ हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड होण्याची शक्यता आहे.