23 कोटी लोकांना गरिबीत ढकललं: राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात
`देश काय असतो मला सांगू नका माझ्या कुटुंबानं देशासाठी बलिदान दिलयं. माझ्या पणजानं १५ वर्ष जेलमधे घातली. आजीनं ३२ गोळ्या झेलल्या वडीलांचे तुकडे तुकडे झाले. उभारलेल्या देशाचे मोदी सरकारनं गेल्या सात वर्षात तुम्ही गरीब आणि श्रीमंत भारत अशी विभागणी केली. लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलं. गरीब भारत शांत बसणार नाही, असा इशारा कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आज लोकसभेत दिला.``;
``देश काय असतो मला सांगू नका माझ्या कुटुंबानं देशासाठी बलिदान दिलयं. माझ्या पणजानं १५ वर्ष जेलमधे घातली. आजीनं ३२ गोळ्या झेलल्या वडीलांचे तुकडे तुकडे झाले. उभारलेल्या देशाचे मोदी सरकारनं गेल्या सात वर्षात तुम्ही गरीब आणि श्रीमंत भारत अशी विभागणी केली. लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलं. गरीब भारत शांत बसणार नाही, असा इशारा कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आज लोकसभेत दिला.``
अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा भारतया दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगारासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन केलं. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही.
देशभरातील तरुण रोजगारासाठी दाही दिशा शोधत आहे. तरुणांना फक्त रोजगार हवा आहे. परंतु मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही आहे, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना सांगितलं. राहुल गांधीच्या भाषणात सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला असता केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
गेल्या वर्षभरात ३ कोटी तरुणांचा रोजगार गेलाय. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाबद्दल बोललात. तुम्हाला देशातील रोजगाराची परिस्थिती माहिती आहे, तरीही तुम्ही आपल्या भाषणात त्याबद्दल काहीच बोलला नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.
किती रोजगार निर्माण करण्यात आला, किती जणांना रोजगार दिला, याबाबत तुम्ही काहीच माहिती दिली नाही. कारण या बद्दल तुम्ही बोलाल तर तरुण तुमच्याकडे पाहून तुम्ही चेष्टा करतोय असं त्यांनी त्यांनी भाजपाला सुनावलं.
लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून गरीबांची संख्या वाढत आहे. युपीए सरकारने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं होतं. मोदी सरकारने २३ कोटी लोकांना परत गरिबीमध्ये ढकललं आहे, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे सर्वच क्षेत्रात अंबानी आणि अदानी दिसतात. छोटे उद्योग तुम्ही मारून टाकलेत, असं ते म्हणाले.
सुप्रिम कोर्ट, भारतीय निवडणुक आयोग आणि पॅगेसिसचा गैरवापर करुन मोदी सरकरानं सर्वसामान्य भारतीयाच्या स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे.
मोदी स्वतः इस्त्रायल मधे जाऊन पॅगॅसीस खरेदी करत आहे, हा देशावर आक्रमक आहे.
देश काय असतो मला सांगू नका माझ्या कुटुंबानं देशासाठी बलिदान दिलयं. माझ्या पणजानं १५ वर्ष जेलमधे घातली. आजीनं ३२ गोळ्या झेलल्या वडीलांचे तुकडे तुकडे झाले. या सगळ्यांच्या रक्ताचा अंश माझ्यामधे आहे. त्यामुळे मला देश कळतो असं राहूल गांधी म्हणाले.
राज्या-राज्यामधे अस्वस्थता असून देश या संकल्पनेला मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिळून भारताच्या मुलभुत पायाला धक्का लावत असल्याचे राहूल गांधींनी सांगितलं.
शेजारील देशांनी भारताला चोहोबाजूनं वेढलं असून चीन आणि पाकीस्थान वेगळं ठेवण्याची भारताची निती होती. मोदी सरकारनं पाकीस्थान आणि चीनला भारताविरोधात एकत्र आणुन भारताला संकटात आणले आहे, असा आरोप राहुल गांधीनी केला.
चीनने योजना करुन डोकलाम आणि लडाखच्या माध्यमातून भारताला अडचणीत आणलं आहे. चीन आणि पाकीस्थाननं एकत्र येऊन शस्त्रखरेदी सुरु केली आहे. देश आता बाहेरुन आणि आतून संकटात असून यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचं राहूल गांधींनी सांगितलं.