मोठी बातमी : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भुपेंद्र पटेल यांची निवड

मोठ्या नाट्यमय घडामोडींमधे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी पायउतार झाल्यानंतर उत्तराधिकारी होणार कोण? याकडे सर्वांचे लक्ष असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या मर्जीतले गुजरातचे वरीष्ठ भाजप नेते भुपेंद्र पटेल यांची आज गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Update: 2021-09-12 12:20 GMT

गुजरातमधे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेचे भाजपने हे मुख्यमंत्रीपदाचे फेरबदल केल्याचे सांगितले जात असून भुपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालीच भाजप आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गुजरातमधील घटलोडीया विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणारे भुपेंद्र पटेल यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाने नवा नेता म्हणुन निवड केली.गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय असलेले पटेल अहमदाबाद मनपा आणि नगरविकास प्राधिकरणाशी संबधीत होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीला १५ महीने शिल्लक असताना काल अचानकपणे विजय रुपानी यांनी राजीनामा दिला. कोविड काळात गुजरात मधील गैरव्यवस्थापन हे त्यांच्या गच्छतींला कारणीभुत असल्याचे सांगितले जात आहे.मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्विपचे वादग्रस्त प्रशासक प्रफुल खोडा यांची नावे चर्चेत होती.

गुजरात निवडणुकीमधे पाटीदार समाजाचे मतदान हे निर्णायक ठरत असते. समाजाचा नेत्याला राज्याच्या नेतृत्व नाही म्हणुन पाटीदार समाज भाजपवर नाराज होता. या बदलातून भाजपने आगामी विधानसभेसाठी जातीय रणनिती निश्चित केल्याचेही सांगितले जात आहे.

निवडणुकीआधी नेतृत्वबदल हा भाजपच्या रणनितीचा भाग आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजपने यंदाच्या वर्षात चार भाजपशासीत राज्यांमधे मुख्यमंत्री बदल केले आहे. विजय रुपानी हे चवथे पदच्युत मुख्यमंत्री आहे. त्यापुर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडुरप्पा यांना जुलै महीन्यात पायउतार करण्यात आले. उत्तराखंडमधे तिरथ सिंह रावत जुलैमधे पायउतार होई तिवेंद्र रावत नवे मुख्यमंत्री झाले.

मावळते मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी माजी मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या १६ महीन्याचा कालावधी शिल्लक असताना पायउतार करुन नवं मुख्यमंत्री करण्यात आलं आहे.गुजरातच्या जातीय समीकरणानंतर इतर भाजपशासीत राज्यामधेही कदाचित याच पध्दतीनं मागणी होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात भाजपचा मराठी मुख्यमंत्री उमेदवार तर हरयाणामधे जाट मुख्यमंत्रीपदाची मागणी होण्याची शक्यता आहे. `पार्टी विथ डिफरन्स` प्रतिमा असलेल्या भाजपला या मागण्या कशा पुर्ण करतेय हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News