गेले काही दशक देशातील सामाजिक, राजकारण ढवळून निघालेल्या बाबरी मशीद खटल्याचा 28 वर्षानंतर आज निकाल ( 30 सप्टेंबरला) लागणार आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या संदर्भात निकाल देणार आहेत. 1 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अयोध्येमध्ये कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली होती. या खटल्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर ही मशीद पाडल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
या ऐतिहासिक खटल्याच्या निमित्ताने लेखक आणि इतिहासतज्ज्ञ राम पुनियानी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचित केली. ज्या आडवाणींनी राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्या आडवाणींना राम मंदीराच्या भूमिपुजनाला उपस्थित राहता आलं नाही. मात्र, न्यायालयात उपस्थित राहावं लागलं. यातून तरुणांनी कोणता धडा घ्यावा? तसंच अयोध्येची जमीन आणि भगवान राम जन्म स्थळ या संदर्भात राम पुनियानी यांनी विश्लेषण केलं आहे. नक्की पाहा...