Anvay Naik Suicide case: आज कोर्टात सुनावणी, अर्णब उपस्थिती राहणार का?
अर्णब गोस्वामी उपस्थित राहणार का?
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोलिसांनी 1800 पानी दोषारोप पत्र 4 डिसेंबर 2020 रोजी दाखल केले आहे.
या खटल्याची सुनावणी अलिबाग येथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आज ७ जानेवारीपासून सुरू होत आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने काढले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी तिनही आरोपी हजर राहणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालायत खटला सुरू
अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात पोलिसांनी 1800 पानी दोषारोप पत्र 4 डिसेंबर 2020 रोजी दाखल केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषारोप पत्र दाखल करून घेऊन अर्णबसह दोघांना 7 जानेवारी रोजी हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले होते.
अर्णबसह दोघांना हजर राहण्याचे आहेत समन्स...
न्यायलायने दोषारोप पत्र दाखल करून घेऊ नये. यासाठी अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबतची सुनावणी ही ११ जानेवारी रोजी होणार आहे. आज अलिबाग येथे होणाऱ्या अन्वय नाईक आत्महत्या खटल्याच्या सुनावणीला अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.