RBI ने आज कर्जदारांना दिलासा मिळेल असा निर्णय घेतला. आज आरबीआय चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या अगोदर EMI भरण्यात दिलेला दिलासा आणखी तीन महिन्यांनी वाढविला आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत EMI नाही भरता आला तरीही त्याचा दंड किंवा क्रेडिट रिपोर्टवर परिणाम होणार नाही. यामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जीडीपी शुन्यापेक्षा खाली येणार..
यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला. शक्तीकांत दास यांनी देशाचा जीडीपी शून्यापेक्षा खाली जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
रेपो दरात घट...
शक्तीकांत दास यांनी आज सकाळी रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये ४० बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात.
तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.