Zee Newsचे सुधीर चौधरी यांना UAEच्या राजकुमारीचा विरोध का?

Update: 2021-11-21 07:06 GMT

Zee Newsचे अँकर सुधीर चौधरी यांना UAEमध्ये आयोजित एका कार्यक्रमात निमंत्रण देण्यात आले आहे, पण त्यांना या कार्यक्रमात बोलावण्याची आयोजकांची हिंमत कशी झाली, असा जाहीर सवाल UAEच्या राजकुमारी हेंद बिंद फैजल अल कासीम यांनी उपस्थित केला आहे. Indian Charter Accountants Associationच्या अबूधाबी शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांनाच राजकुमारीने सवाल विचारला आहे. आपल्या टीव्हीवरील कार्यक्रमांमधून सुधीर चौधरी हे वारंवार पूर्वग्रह दुषित मुस्लिमविरोधी भूमिका मांडत असतात, असा आरोप राजकुमारीने केला आहे. एवढेच नाही तर टीव्ही अँकर असलेले सुधीर चौधरी हे आपल्या कार्यक्रमांमधून इस्लाम धर्म आणि त्याच्या अनुयायांना बदनाम करतात असा आरोप करत या राजकुमारीने त्यांना दहशतवादी असे संबोधले आहे.

या राजकुमारीने ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. "मुस्लिम धर्माविषयी पूर्वग्रह असलेल्या या व्यक्तीला माझ्या शांतताप्रिय देशात बोलावण्याची हिंमत कशी झाली?" असा सवाल तिने विचारला आहे. "2019 आणि 20 मध्ये सुधीर चौधरी यांनी CAA आणि NRC विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मुस्लिम समाजाविरोधात विष पेरण्याचे काम त्यांच्या कार्यक्रमांमधून केले. त्यांनी शाहीनबाग, नवी दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये आंदोलन करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थी आणि महिलांविरोधात फेक न्यूज चालवल्या."

राजकुमारीने Institute of Chartered Accountants of India ला टॅग करत एका दहशतवाद्याला तुम्ही UAEमध्ये का बोलावत आहात, असा सवाल विचारला आहे. "भारतातील मुस्लिमांविषयी कायम द्वेष पसरवणाऱ्या टीव्ही अँकर आणि गोदी मीडियामधील एक अँकर म्हणून सुधीर चौधरी प्रसिद्ध आहे," अशीही टीका त्यांनी केली आहे. एवढेच नाही तर २०२०मध्ये भारतात मुस्लिमांमुळे कोरोनाचा प्रसार वाढला असा आरोप करणारी मोहीमच त्यांनी चालवली होती, पण विविध हायकोर्टांनी तबलिगी जमातने कोरोनाचा प्रसार केला हा केवळ प्रपोगंडा होता, असे निर्णय दिले आहेत, असीह उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

Tags:    

Similar News