Aurangabad Crime News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) लोकार्पण झाल्यावर हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग खुला होताच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. कारण आधी अपघात आणि आता एका तरुणाचा बंदुकीतून फायरिंग करतानाचा व्हिडिओ (Video) समोर आल्याने समृद्धी महामार्गाची चर्चा पाहायला मिळत आहे. औरंगाबादजवळ असलेल्या सम्रुद्धी महामार्गावरील बोगद्या समोर उभं राहून एका तरुणाने बंदुकीतून फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाळु गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे.
कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काळ्या रंगाची स्कारपिओ (क्र. MH 20 FG 2020) दिसत असून, ज्यात काळा टीशर्ट घातलेला एक तरुण दिसत आहे. हा तरुण हातात एक बंदुक घेऊन गाडीसमोर येतो आणि हवेत फायरिंग करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे अग्नीशस्र मधुन जिवंत काडतुस फायर होतांना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जवळ असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्या समोर हा सर्व प्रकार घडला आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल...
समृद्धी महामार्गाच्या बोगद्या समोर उभं राहून अग्नीशस्रमधुन जिवंत काडतुस फायर करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंत ज्ञानोबा पाचंगे (वय 40 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून बाळु गायकवाड याच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला पकडण्यासाठी फुलंब्री पोलिसांनी दोन पथक तयार केले असून, एक फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत तर दुसरा औरंगाबाद शहरात रवाना करण्यात आला आहे.
रील बनवण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर....
सोशल मिडीयावर व्हिडिओ रील बनवण्याचा क्रेज सद्या तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद परिसरातून गेलेला समृद्धी महामार्ग अशाच रील बनवणाऱ्या तरुणांचा अड्डा बनला आहे. स्थानिक तरुणांसह शहरातील अनेक तरुण-तरुणी व्हिडिओ बनवण्यासाठी समृद्धी महामार्गावर येतांना पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने समजू शकतो, पण आता वाहतूक सुरु झाल्यावर देखील तरुण अशाप्रकारे व्हिडिओ तयार करण्यासाठी या महामार्गाचा वापर करत असतील तर हा प्रकार गंभीर आहे.