प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्वाचा दिवस भारतीय राज्यघटना अमलात येऊन आज तब्बल 73 वर्ष पूर्ण झालीत मात्र खरंच सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचला आहे का? हा प्रश्न आहे कारण अद्यापही निवडणूका वीज, रस्ते, पाणी ,शिक्षण या मुद्द्यांवर लढवल्या जात आहेत. शिवाय जातीय राजकारण मोठ्या प्रमाणावर वाढत पाहायला मिळत आहे. हे सगळे थांबवून युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणात आलं पाहिजे इतरांना दोष न देता स्वतःपासून चांगल्या कार्याची सुरुवात केली पाहिजे,असे सुप्रसिद्ध गायक डॉ.उत्कर्ष शिंदे यांनी म्हटलं आहे. Max Maharashtra माध्यम म्हणून करत असलेले प्रयत्न म्हणाला भावतात असे उत्कर्ष शिंदेंनी सांगितले प्रजासत्ताक दिन आणि Max Maharashtra स्थापना दिनाच्या औचित्य साधत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...