हटके आंदोलन; पिण्याच्या पाण्यासाठी तरुणाच विहिरीत उतरून उपोषण

पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका तरुणाने विहिरीत खाट लटकावून त्यावर उपोषणास प्रारंभ केला. या अनोख्या आंदोलनामुळे मात्र प्रशासनाची धावपळ उडाली आहे.;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-02-25 03:47 GMT
हटके आंदोलन; पिण्याच्या पाण्यासाठी तरुणाच विहिरीत उतरून उपोषण
  • whatsapp icon

गावातील मंगेश साबळे याने काही दिवसांपूर्वी याच मुद्यावरून ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या खुर्च्या जाळल्या होत्या. त्यानंतर त्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर ही गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने मंगेशने गांधीगिरी पद्धतीने थेट विहिरीतच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

गेवराई पायगा गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, विहिरीतून महिला, वृद्धांना शेंदून (काढून) पाणी भरावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विहिरीच्या पाण्यामुळे चहा खराब होतो. बालकांना घसादुखीचा त्रास होतो. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न मंगेश साबळे याने उपस्थित केला आहे.

Tags:    

Similar News