यात्रेत चालताना मुलीच्या बुटाची सुटली लेस, राहुल गांधींनी केलेल्या कृत्याचा तुम्हाला अभिमान वाटेल
राहुल गांधी लोकांशी संवाद साधत आहेत. दुःख समजून घेत आहेत. अनेकांची गळाभेट घेत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सामान्य लोकांमध्ये उंचावली आहेत. त्यापार्श्वभुमीवर यात्रेत चालत असतानाच राहुल गांधी यांनी केलेल्या कृत्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल.
7 सप्टेंबरपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा( Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. दरम्यान या यात्रेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत चालत असताना माजी मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार (Shivani wadettiwar) यांच्या बुटाची लेस सुटली. त्यानंतर राहुल गांधी यांनी संपुर्ण यात्रा काही वेळासाठी थांबवली आणि शिवानी वडेट्टीवार यांनी बुटाची व्यवस्थित लेस बांधल्यानंतरच यात्रा सुरु केली. याबाबत शिवानी वडेट्टीवार यांनी ट्वीट करून आपला अनुभव सांगितला आहे.
शिवानी वडेट्टीवार यांनी ट्विटरवर फोटो ट्वीट करत म्हटले आहे की, खरा नेता कुणालाही मागे ठेवत नाही. तो आपल्याइतकीच दुसऱ्यांची कालजी घेतो, असं मत व्यक्त केले आहे.
A true leader never leaves anybody
— Shivani Wadettiwar (@SVW790) November 10, 2022
behind!
Have never met a more Caring leader
ever before!
He stopped the entire Yatra cause my
shoelace was open.
Leader with a golden heart!#BharatJodaYatra pic.twitter.com/ZeniumhzYm